Blood sugar level 300 symptoms : 300 पार ब्लड शुगर झाल्यावर शरीरात दिसतात 'हे' बदल, वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

Blood sugar level: रक्तातील ब्लड शुगर वाढली तर अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर ब्लड शुगर लेवल ३०० पार झाली तर हे चिंतेच कारण असू शकतं. यावेळी काय लक्षणं दिसतात ते पाहूयात
Blood sugar level
Blood sugar levelsaam tv
Published On

मधुमेही रूग्णांना त्यांच्या आहाराची काळजी घेणं गरजेचं असतं. या रूग्णांना ब्लड शुगर कंट्रोल करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी या रूग्णांना एक हेल्दी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. जर नियमित पद्धतीने एक्सरसाईज आणि गोळ्याचं सेवन केलं तर मधुमेह नियंत्रणात राहतो.

जर रक्तातील ब्लड शुगर वाढली तर अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये हृदयाचे आजार, किडनीच्या समस्या तसंच डोळ्यांच्या समस्यांचा समावेश आहे. मात्र अनेकदा ब्लड शुगर अधिक वाढण्याचा धोका असतो. जर ब्लड शुगर लेवल ३०० पार झाली तर हे चिंतेच कारण असू शकतं.

किती प्रमाणात ब्लड शुगर आरोग्यासाठी घातक?

डायबेटोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, 180 mg/dL आणि 250 mg/dL मधील रक्तातील साखरेचं प्रमाण उच्च रक्त ग्लुकोज किंवा हायपरग्लाइसेमिया मानलं जाते. यामध्ये 250 mg/dL किंवा त्याहून अधिक ब्लड शुगर ही अत्यंत धोकादायक मानले जाते. अशा परिस्थितीत रुग्णांना आपत्कालीन उपचारांची गरज आहे. त्यामुळे जर तुमची रिडींग यापेक्षा जास्त आली तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी.

Blood sugar level
High Blood Pressure: ब्लड प्रेशरची औषधं अचानक घेणं थांबवलं तर...; असं करणं किती असू शकतं धोकादायक?

मात्र जर कोणा व्यक्तीचं ब्लड शुगर 300 mg/dL किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर हे फार धोकादायक मानलं जातं. अशा परिस्थितीमुळे डायबिटिक कीटोएसिडोसिस आणि डायबिटिक कोमा सारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय 600 mg/dL जास्त ब्लड शुगर लेवल रूग्णांच्या आरोग्यासाठी घातक मानली जाते. या स्थितीला हायपरग्लाइसेमिक हायपरोस्मोलर नॉनकेटोटिक सिंड्रोम (HHNS) असं म्हटलं जातं.

३०० पार ब्लड शुगर झाल्यावर शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात?

  • जास्त प्रमाणात तहान लागणं

  • सतत लघवी होणं

  • नजर कमजोर होणं

  • तोंड सुक पडणं

  • त्वचा कोरडी होणं

  • डोकेदुखी

  • थकवा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Blood sugar level
Rice or Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी आहारात कशाचा समावेश करणं योग्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com