Rice or Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी आहारात कशाचा समावेश करणं योग्य?

Rice or Roti for Weight Loss: जर तुम्हाला वजन कमी करायचंय तर भात खावा की चपाती? आज जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय खाणं ठरेल फायदेशीर?
Rice or Roti for Weight Loss
Rice or Roti for Weight Losssaam tv
Published On

भात आणि चपाती हे आपल्या जेवणातील एक मुख्य पदार्थ मानले जातात. अनेकांना तर भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचंय तर यापैकी कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न असतो. कदाचित तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, चपाती आणि भात या दोघांमध्येही कार्बोहाइड्रेट असतं. मात्र यांच्यातील पोषण आणि कॅलरीजमध्ये फरक असतो. आज जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी भात की चपाती काय खाणं ठरेल फायदेशीर?

काय आहे भात-चपातीमधील फरक

भात आणि चपाती या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. मात्र त्यामध्ये देखील एक फरक आहे. एका मध्यम आकाराच्या चपातीमध्ये 70-80 कॅलरीज असतात. तर दुसरीकडे एक पांढऱ्या तांदळाच्या वाटीच्या भातामध्ये अंदाजे 200-240 कॅलरीज असतात. याचाच अर्थ भात खाल्ल्याने तुम्हाला जास्त कॅलरीज मिळतात. ज्यावेळी कॅलरीज वाढतात तेव्हा वजनात देखील वाढ होते.

Rice or Roti for Weight Loss
Yoga Tips For Strong Memory : मुलांनी कितीही वाचलं तरी उत्तरं लक्षात राहत नाहीत? ही आसने करताच वाढेल स्मरणशक्ती

वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर?

जर तुम्हाला वजन कमी करायचंय तर अशावेळी चपाती खाणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. चपातीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखं वाटत. परिणामी तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि तुमच्या खाण्याचं प्रमाण घडतं.

काही लोकांना भात प्रचंड आवडतो. जर तुम्हाला भात खाऊन वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ब्राईन राईसचा ऑप्शन ट्राय करू शकता. यामध्ये देखील जास्त फायबर असतं, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटू लागतं.

१०० ग्रॅम भातातून मिळणारे पोषक घटक

  • कॅलरी: जवळपास 130 कॅलरी

  • कार्बोहाइड्रेट्स: 28-30 ग्रॅम

  • प्रोटीन: 2.5-3 ग्रॅम

  • फॅट: 0.2-0.3 ग्रॅम

  • फायबर: 0.5-1 ग्रॅम

१०० ग्रॅम गव्हाच्या पीठातून मिळणारे पोषक घटक

  • कॅलोरी: जवळपास 340-350 कॅलरी

  • कार्बोहाइड्रेट्स: 72-75 ग्रॅम

  • प्रोटीन: 12-13 ग्रॅम

  • फॅट्स: 1.5-2 ग्रॅम

  • फायबर: 10-12 ग्रॅम

Rice or Roti for Weight Loss
आता एक ब्लड टेस्ट 30 वर्ष आधीच सांगणार महिलांमधील हृदयाच्या आजारांचा धोका, वाचा संशोधनात नेमकं काय काय समोर आलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com