मुलांची स्मरणशक्ती चांगली असावी, केलेला अभ्यास जास्त वेळ लक्षात रहावा, आपल्या मुलांनी शाळेत पहिला नंबर मिळवावा, अशा अनेक पालकांच्या अपेक्षा असतात. पालकांच्या या अपेक्षा काही मुलं हुशार असल्यास लगेचच पूर्ण करतात. मात्र काही मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतात. त्यांना वाचलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. मुलं उत्तरे सतत विसरतात. काही वेळा तर अगदी संपूर्ण पाठांतर झालेलं असताना देखील मुलांना परीक्षेत काहीच आठवत नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळे आज या बातमीमधून मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही आसने पाहणार आहोत.
सर्वांगासन
मुलांची बुद्धी तल्लख व्हावी यासाठी त्यांना सर्वांगासन करण्यास सांगा. हे आसन मुलांच्या बुद्धीसह अन्य अवयवांसाठी फार फायदेशीर आहे. सर्वांगासन करणे फार सोपे आहे. यासाठी मुलांना जमिनीवर मांडी घालून बसायला सांगा. दोन्ही पाय आपल्या मांडीवर असले पाहिजेत. पाठीचा कणा ताठ आणि दोन्ही हात एकमेकांना जोडून डोक्यावर ठेवावे. अशा पद्धतीने सर्वांगासन अभ्यासाला सरुवात करण्याआधी देखील करता येते.
पद्मासन
मुलांना योगा करताना पद्मासन सुद्धा शिकवा. पद्मासन केल्याने मेंदूला रक्त पुरवठा होतो. त्यामुळे बुद्धी आणि स्मरणशक्ती चांगली वाढते. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर सरळ झोपा. त्यानंतर पाय आणि खांद्यांपर्यंतचं संपूर्ण शरीर हाताने उचलून घ्या. हे आसन मुलांनी सकाळी झोपेतून उठल्यावर केल्यास उत्तम.
वृक्षासन
वृक्षासन सुद्धा स्मरणशक्ती वाढवणारं आसन आहे. हे आसन फक्त लहान मुलं नाही तर मोठ्या व्यक्ती देखील दररोज करू शकतात. त्यासाठी सर्वात आधी जमिनीवर सरळ उभे राहा. त्यानंतर उजवा पाय घडी करून गुडघ्या जवळ घेऊन या. पुढे तुमचे दोन्ही हात हवेत जोडून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही वृक्षासन करू शकता.
वज्रासन
वज्रासन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे आसन करताना जमिनीवर दोन्ही गुडघ्यांवर बसा. तसेच तुमचे दोन्ही हात मांडीवर ठेवून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही वज्रासन करू शकता. हे आसन करताना ताठ बसणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आसन केल्याने मुलांना वाचलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित आणि जास्त काळ लक्षात राहतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.