लहान वयातच मुलांचा सर्वांगीण विकास होणे खूप महत्त्वाचे असते. कारण यावर मुलांचे भविष्य अवलंबून असते. आजकालची मुलं खूप फास्ट फॉरवर्ड आहेत. अनेक गोष्टी त्यांना लहान वयात समजतात. त्यामुळे काही मुलं वेळेच्या अगोदरच बुद्धिमान होतात. पण अशा मुलांच्या वागणुकीवरून नेमकं त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे हे कळणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक मुलांना ओरडतात किंवा त्यांच्यावर चिडचिड करतात. असे होऊ नये म्हणून तुमची मुलं या चुका करत असतील तर घाबरून न जाता, त्यांना योग्य मार्गदर्शन करा. कारण हीच त्यांच्या बुद्धिमत्तेची लक्षण आहेत.
पालकांची मदत नाकारणे
जर तुमची मुलं सर्व काम स्वावलंबीपणे करत असतील तर ती कमी वयात मोठी आणि समजूतदार झाली समजा. त्यांना स्वतःची कामे करायला आवडतात. मुलांची ही सवय त्याचा आत्मविश्वास वाढवते. त्यांची बुद्धिमत्ता दर्शवते.
संवाद साधणे
न घाबरता मुलं जर आपली मत किंवा आपले विचार सर्वांसमोर निर्भिडपणे बोलत असतील तर त्यांची बुद्धिमत्ता खूप भक्कम झाली आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. मुल आपली चूक कबूल करत असतील तर त्यांना न ओरडता आणि न रागावता त्यांचा आदर करावा. तुमची मुलं तुम्हाला सर्व सांगत असतील तर ती तुम्हाला तुमचा मित्र समजू लागली आहेत. नियमित संवाद साधल्यामुळे मुलं मनमोकळे बोलू लागतात.
मुलं फक्त स्वतःसोबत जास्त वेळ घालवतात
बरेच वेळा पालक मुलांना हाका मारतात आणि मुलं मात्र त्यांच्या विश्वात मग्न असतात. मात्र पालकांना याचा राग येतो. पण पालकांनी मुलांना समजून घेतल पाहिजे. कारण जर मुलं स्वतःसोबत जास्त वेळ घालवत असतील म्हणजे नक्कीच त्यांचा अभ्यास चालू आहे. त्यांचे चिंतन चालू आहे. पालकांनी समजून घेतले पाहिजे की, यामुळे मुलांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची खूप चांगली क्षमता आहे.
सतत विचारात फिरणे
जर तुमची मुलं एका ठिकाणी शांत बसत नसतील तर त्यांच्या मनात असंख्य विचार चालू असतात. मुलं कुतुहलाने सर्व गोष्टी पाहत असतात. त्यांचे निरीक्षण करतात. यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो.
सतत प्रश्न विचारणे
जर तुमचं मुलं सतत प्रश्न विचारत असेल तर त्यांच्यावर ओरडू नका. कारण हे चांगल लक्षण आहे. मुलांच्या प्रश्नांची उत्तर द्या. यामुळे मुलांना लहान वयापासूनच समजून काम करण्याची सवय लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.