Yoga For Hair Growth : लांबसडक केसांसाठी कोणतंही तेल लावण्याची गरज नाही; फक्त १५ मिनिटं करा 'हे' योगासन

Hair Growth Yogasan : केस छान काळेभोर आणि लांबसडक व्हावेत यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध तेलांचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा केसांच्या वाढीसाठी आजवर अनेक प्रकारचे तेल वापरले असतील.
Hair Growth Yogasan
Yoga For Hair GrowthSaam TV
Published On

योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यांत चांगले मानले जाते. डिप्रेशन, स्ट्रेससह अनेक समस्यांवर उपाय म्हणून व्यक्ती योगासने करतात. तरुण मुलं-मुली असो किंवा अगदी शाळेत शिकणारे विद्यार्थी, आजकाल प्रत्येक व्यक्तीला केसांच्या समस्या आहेत. केस छान काळेभोर आणि लांबसडक व्हावेत यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध तेलांचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा केसांच्या वाढीसाठी आजवर अनेक प्रकारचे तेल वापरले असतील.

Hair Growth Yogasan
Hair Care: नारळपाणी आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर

विविध पद्धतीचे तेल केसांवर लावल्यानंतर देखील काहींना या समस्यांवर हवं तसं समाधान मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी केसांवर एक रामबाण उपाय शोधला आहे. तीन प्रकारची काही खास योगासने केल्याने केसांच्या विविध समस्या कायमच्या दूर होण्यास मदत होते. केस लांबसडक आणि अगदी काळेभोर होतात.

अधो मुख श्वानासन

अधो मुख श्वानासन या योगासनाला डाउनवर्ड-फेसिंग डॉग असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये आपले आय आणि हात जमिनीला टेकलेले असतात आणि आपलं डोकं सुद्धा हवेत तरंगत असतं. त्यामुळे हे योगासन करताना आपल्या संपूर्ण शरीरात रक्त संचार होतो. तुम्ही केसांच्या वाढीसाठी हे उत्तम योगासन आवश्य करू शकता.

उत्तानासन

उत्तानासन हे सुद्धा केसांच्या वाढीसाठी एक अतिशय उत्तम आसन आहे. याने देखील शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत चालतो आणि आपल्या मेंदूला सुद्धा रक्त पुरवठा होतो. त्यासाठी तु्म्हाला सर्वात आधी सरळ रेषेत उभं रहावं लागेल. त्यानंतर कमरेतून खाली वाका आणि तुमचं डोकं अगदी पायांपर्यंत घेऊन या. डोकं गुडघ्यांच्या खाली आले पाहिजे. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी पायांच्या मागच्या बाजूला स्पर्श करा. किमान ५ मिनिटे हे योगासन तुम्हाला करायचे आहे.

सर्वांगासन

सर्वांगासन केल्याने मेंदू आणि पाठ म्हणजे शरीराच्या वरील भागात रक्तपुरवठा होतो. हे योगासन केल्याने हेअर ग्रोथ फार छान होते. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जमिनीवर सरळ झोपायचं आहे. सरळ झोपल्यावर आपल्या दोन्ही हातांनी कमरेचा भाग आणि पाय सरळ रेषेत वरती उचलून घ्यायचेत. या आसनामध्ये तुमचे मान आणि फक्त डोकं जमिनीवर राहणार आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hair Growth Yogasan
Yoga For Hair Growth: चमकदार आणि घनदाट केसांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com