ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी राहण्यासाठी योग करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
निरोगी शरीरासह केसांच्या वाढीसाठी योग करणे ही फायदेशीर आहे.
चला तर पाहूयात केसांच्या निरोगी वाढीसाठी कोणती योगासने करायाल हवीत.
केसांच्या वाढीसाठी कपालभाती हे आसन करणे फायदेशीर ठरते. साधारण दररोज तुम्ही १० ते १२ मिनिटे कपालभाती आसनाता सराव करावा.
घनदाट केस जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अधोमुखान हे आसन करु शकता. दररोज हे आसन करणे चांगले ठरते.
सर्वांगासन आसन केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. केस गळतीची समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज हे आसन करावे.
केसांच्या वाढीसाठी बालासन हे आसन करणे फायदेशीर ठरते. हे आसन केल्याने इतरही आरोग्यदायी फायदे होतात.
केसासंबंधित अनेक समस्या असलेल्या व्यक्तींनी शिर्षासन हे आसन करावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.