International Yoga Day 2024 : फिटनेस फ्रिक अमृता खानविलकर इतकी फिट कशी ? 'योगा दिवसा'निमित्त चाहत्यांना दिल्या खास टिप्स

Amruta Khanvilkar On Yoga Day 2024 : आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. या योगा दिवसानिमित्त अमृताने चाहत्यांना फिट राहण्याबद्दलचे काही खास टीप्स दिलेल्या आहेत.
International Yoga Day 2024 : फिटनेस फ्रिक अमृता खानविलकर इतकी फिट कशी ? 'योगा दिवसा'निमित्त चाहत्यांना दिल्या खास टिप्स
Amruta Khanvilkar On Yoga Day 2024Saam Tv

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे सगळेच फिट राहण्यासाठी वेगवेगळे व्यायाम आणि योगा करण्याचा प्रयत्न करत असतात. आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. या योगा दिवसानिमित्त सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण योगा करत स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील अगदी न चुकता रोज योगा करते. फॅशनसोबतच तिच्या फिटनेसचीही कायमच चर्चा होते. शूट आणि व्यायाम यांचा योग्य समतोल साधत अमृता रोज योगा करते आणि फिट राहते.

International Yoga Day 2024 : फिटनेस फ्रिक अमृता खानविलकर इतकी फिट कशी ? 'योगा दिवसा'निमित्त चाहत्यांना दिल्या खास टिप्स
Reema Lagu Birth Anniversary : बॉलिवूडची ‘कूल आई’! ‘सिंगल मदर’ रिमा लागू यांनी लेकीचा सांभाळ कसा केला? जाणून घ्या

अमृता नेहमीच इन्स्टाग्रामवर काही खास योगा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना फिट राहण्याची प्रेरणा देत असते. तिच्या फिटनेसची कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. 'आंतरराष्ट्रीय योगा दिवस'निमित्त अमृताने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.

अमृता म्हणते "योगा करणं हा माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे. शूटमधून कायम वेळ काढून मी योगा करते. जेव्हा आपण योगा करतो तेव्हा ब्रिदिंग हे नीट जमलं पाहिजे तुम्हाला आसन नाही आली तरी चालेल पण तुम्हाला व्यवस्थित ब्रिदिंग जमलं पाहिजे. रोजच्या जीवनात रोज न चुकता योगा करणं हा टास्क असला तरी त्यातलं सातत्य जपून कायम व्यायाम केला पाहिजे. प्रत्येक माणूस हा फिट राहण्यासाठी व्यायाम करतोच पण एक कलाकार म्हणून कामासोबत व्यायाम करण्याकडे देखील माझा कल जास्त असतो." अमृता खानविलकरने 'आंतरराष्ट्रीय योगा दिवस'निमित्त चाहत्यांना योगा करण्याची प्रेरणा दिलेली आहे.

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटातून अमृता खानविलकरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या अभिनयाचे आणि तिच्या डान्स फक्त देशातच नाही तर, जगभरामध्ये जोरदार कौतुक झाले. अमृता आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्समध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बाबूराव' यासारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. अमृता शेवटची 'लुटेरा' या वेबसीरीजमध्ये दिसली. झी मराठीवरील "ड्रामा ज्युनियर" या रिॲलिटी शोची ती जज बनली आहे. त्यासोबतच अमृता लवकरच '36 डे' या चित्रपटातूनही लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

International Yoga Day 2024 : फिटनेस फ्रिक अमृता खानविलकर इतकी फिट कशी ? 'योगा दिवसा'निमित्त चाहत्यांना दिल्या खास टिप्स
Shraddha Kapoor News: बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर होणार मोदींच्या घरची सून?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com