Infertility: ५ पैकी ३ महिलांना IVF ची गरज; प्रजनन दरातही घसरण

Infertility: लग्नानंतर मूल होत नसेल तर इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा आधार घेतला जातो. मात्र आताच्या घडीला, पाचपैकी तीन महिलांना आयव्हीएफची गरज भासत असल्याचं समोर आलं आहे.
Infertility
Infertilitysaam tv
Published On

लग्नानंतर प्रत्येक जोडप्याची एक इच्छा असते. ही इच्छा म्हणजे पालक होण्याची. सध्या वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं पुढारलंय की, फार कमी गोष्टी आहेत, ज्या अशक्य मानल्या जातात. लग्नानंतर मूल होत नसेल तर इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा आधार घेतला जातो. या विकसीत तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत अनेक जोडप्यांचं आयुष्य सुखी झालेलं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, जवळपास १० वर्षांपूर्वी पाचपैकी केवळ एकाच महिलेला आयव्हीएफची गरज भासत होती. मात्र सध्याच्या काळात परिस्थिती बदलली असल्याचं पाहायला मिळतंय. आताच्या घडीला, पाचपैकी तीन महिलांना आयव्हीएफची गरज भासत असल्याचं समोर आलं आहे.

आरोग्य सेवा संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या दशकात भारतातील सामान्य प्रजनन दर २० टक्क्यांनी घसरला आहे. इतंकच नव्हे तर आजच्या काळात भारतातील जवळपास तीन कोटी लोक वंध्यत्वाने त्रस्त असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

Infertility
High Blood Pressure: ब्लड प्रेशरची औषधं अचानक घेणं थांबवलं तर...; असं करणं किती असू शकतं धोकादायक?

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. श्रुती माने यांच्या सांगण्यांनुसार, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा, दूषित वातावरण इत्यादींचा परिणाम पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर होत असतो. शिवाय याचाच परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही होताना दिसतो. त्‍यामुळे महिला नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करू शकत नाहीत. यावेळी त्यांना आयव्हीएफचा मार्ग स्विकारावा लागतो. दशकापूर्वीपर्यंत उपचारासाठी येणाऱ्या पाचपैकी केवळ एका महिलेला आयव्हीएफची गरज होती, मात्र आता ही संख्या तीनवर येऊन पोहोचली आहे.

बदलती जीवनशैली आणि इतर आजार कारणीभूत

सध्याच्या काळात मुलींची लग्न उशीराने होतात. यामागे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे, करियरसाठीची धावपळ. करिअरच्या शर्यतीत अनेक महिला आई होण्याचं वय चुकवतात. त्याचप्रमाणे बदललेली आणि चुकीची जीवनशैली यामुळे अनेक आजारंही मागे लागतात. तणाव, नैराश्य, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या समस्यांमुळे महिलांच्या वाढत्या वयाबरोबर अंड्यांमध्ये दोष आढळून आलेत. अशामुळे अंड्यांचं प्रमाण कमी होतं आणि लहान वयातच गुणवत्ता खराब होते. परिणामी गर्भधारणेची समस्या वाढताना दिसते.

कमी वयातील महिलाही निवडतात हा पर्याय

डॉ. श्रुती यांनी पुढे सांगितलं की, पूर्वी ३५ ते ४० वयोगटातील महिला आई होण्यासाठी आयव्हीएफचा पर्याय निवडत होत्या. परंतु आता वयाच्या २५व्या वर्षी महिला हा पर्याय निवडताना दिसतात. अनेक महिलांना लहान वयातच आई होण्याची इच्छा असते, मात्र आजारपण, कामाच्या ताणामुळे त्या नैसर्गिक पद्धतीने आई होऊ शकत नाहीत. त्यामुळे वेळ न दडवता त्या आयव्हीएफचा मार्ग निवडतात.

Infertility
Rice or Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी आहारात कशाचा समावेश करणं योग्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com