Man pretended disabled train begging video viral SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: ट्रेनमध्ये अपंग असल्याचं नाटक, तरुणाने भीकही मागितली; स्टेशन आल्यानंतर असं काही केलं की प्रवासी चकीत; VIDEO व्हायरल

Man pretended disabled train begging video viral: रेल्वेत प्रवाशांना धक्का देणारी घटना समोर आली आहे. एका माणसाने स्वतःला अपंग असल्याचे भासवून प्रवाशांकडून भीक मागितली. मात्र, रेल्वेतून खाली उतरल्यानंतर तो धावताना दिसला आणि प्रवासी थक्क झाले.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने ट्रेनच्या डब्यात स्वतःला दिव्यांग असल्याचं दाखवत प्रवाशांकडून भीक मागितल्याचं पाहायला मिळतंय. मात्र डब्यातून खाली उतरल्यावर तोच व्यक्ती व्यवस्थित चालत असल्याचंही एका व्यक्तीने त्याच्या कॅमेरात कैद केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हा दिव्यांग व्यक्ती ट्रेनच्या डब्यात रांगत प्रवाशांसमोर दयेने भीक मागताना दिसतो. त्याच्या पाठीवर एक बॅग देखील आहे. काही प्रवासी त्याला मदत करतानाही दिसतात. तर काही प्रवासी त्याला भीक देण्यासाठी नकार देतात. मात्र ट्रेन थांबल्यानंतर तो डब्यातून खाली उतरतो आणि पुढे पायांवर चालून निघून जातो.

हा संपूर्ण प्रकार ट्रेनमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड केल्याची माहिती आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला. पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि शेअर्स मिळू लागले. अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी हा प्रकार फसवणुकीचा असल्याचं म्हणत अशा प्रकारे भीक मागणाऱ्या टोळ्यांवर कारवाईची मागणी केलीये.

दरम्यान, या व्हिडीओच्या सत्यतेची खात्री संबंधित अधिकाऱ्यांकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. व्हिडीओ नेमका कधी आणि कोणत्या स्थानकादरम्यान शूट करण्यात आला, याबाबतही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र या व्हिडीओमुळे मुंबई लोकलमधील भीक मागण्याच्या प्रकारांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT