Mumbai local bhayandar video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: आत्महत्येचा प्रयत्न! रेल्वे येताच पुलावरुन थेट रुळावर उडी मारली अन्... थरकाप उडवणारा VIDEO

Mumbai local bhayandar video: सध्या त्याला मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांना आणि अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे," असे ट्वीट रेल्वे प्रशासनाने या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Gangappa Pujari

Bhayandar Viral video:

सध्याची तरुणाई अगदी छोट्या छोट्या कारणांवरुन, अपयशाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. सोशल मीडियावर अशा अनेक बातम्या, धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या मुंबईमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. सुदैवाने भाईंदर रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल आणि पश्चिम रेल्वेच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला.

समोर आलेल्या माहितीनुसार, भाईंदर (Bhayandar) येथील पुलावरुन रेल्वे रुळावर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र भाईंदर रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल आणि पश्चिम रेल्वेच्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. तरुणाने उडी मारताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आणि पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या तरुणाला रेल्वे रुळावरून बाजूला ओढले. जवानांच्या सतर्कतेमुळेच तो ट्रेनखाली जाण्यापासून वाचला.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाला उडी मारल्यानंतर दुखापत झाल्याचे दिसत आहे. त्याने उडी मारल्यानंतर लगेचच जवानांनी त्याला बाजूला ओढल्याने मोठा अनर्थ टळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, "आरपीएफ कर्मचाऱ्यांनी भाईंदर येथील एका व्यक्तीला एफओबी वरून थेट रुळांवर उडी मारल्यानंतर आत्महत्येपासून वाचवले. त्याला मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच्या कुटुंबीयांना आणि अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे," असे ट्वीट रेल्वे प्रशासनाने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT