Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये डंपिंग ग्राऊंडला भीषण आग, अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी

Mira Bhayandar Fire News : मिरा-भाईंदरच्या उत्तन डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग क्षणार्धात सर्वत्र पसरली. आग लागल्यानंतर धुराचे लोट आकाशाला भिडले आहेत.
Mira Bhayandar Fire :
Mira Bhayandar Fire : Saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, वसई

Mira Bhayandar Fire Update :

मिरा-भाईंदरच्या उत्तन डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग क्षणार्धात सर्वत्र पसरली. आग लागल्यानंतर धुराचे लोट आकाशाला भिडले आहेत. डम्पिंग ग्राउंडला आग लागल्यच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. (Latest Marathi News)

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमधील साचलेल्या कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही आगीची दुर्घटना घडली आहे. डम्पिंग ग्राउंडला आग लागल्यानंतर परिसरात धूराचे लोट पसरले. ग्राऊंडला आग लागल्यानंतर धूर परिसरात धुमसू लागला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mira Bhayandar Fire :
Nagpur Firing Case : राज्यात चाललंय काय? नागपुरात दिवसाढवळ्या एकाची गोळ्या झाडून हत्या

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. या डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा मारण्यास सुरुवात केली. डम्पिंग ग्राऊंडवर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग जोराने भडकत होती. मात्र, अग्निशमन दलाचे जवानांचे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Mira Bhayandar Fire :
Nashik Fire : देव्हाऱ्यातील दिव्यामुळे पेटला काळाराम मंदिराजवळील वाडा; मोठी वित्तहानी

आतापर्यंत अनेकदा लागली आग

मिरा-भाईंदरच्या उत्तन डम्पिंग ग्राउंडला अनेदा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अनेकदा ग्राऊंडला लागलेली आग विझविण्यास दहा-दहा दिवस लागले आहेत.

वसईच्या जेट्टीवर रो रो बोट धडकली

चार दिवसांपूर्वीच वसईच्या समुद्रात सुरु झालेल्या रो रो सेवेचा प्रवासी बोटीचा अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. दुपारी भाईंदरहून वसईसाठी निघालेली बोट वसईच्या जीटीपर्यंत पोहोचली. मात्र ओहोटी असल्याने अंदाज न आल्याने ही बोट जेट्टी बंदराला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बोटीवर असलेले प्रवासी व प्रवाशांच्या वाहनांना मोठा धक्का बसला व ते खाली कोसळले.

अपघाताचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात अनेक वाहने पडून नुकसान देखील झाले आहे. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीच्या सहाय्याने ही अडकलेली बोट पुन्हा पाण्यात उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com