Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष निवडीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'शरद पवार यांनी भाकरी...'

शरद पवारांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवारांच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSaam Tv

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड केली. राष्ट्रवादीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवारांनी घोषणा केली. शरद पवारांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवारांच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवार यांनी भाकरी फिरविली असं म्हणतात. मात्र, त्यांच्या निर्णयाला भाकरी फिरविणे म्हणत नाही, तर ही धुळफेक आहे. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय आहे'.

Devendra Fadnavis News
Supriya Sule On Ajit Pawar: अजित पवार नाराज आहेत का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

नागपूर दौऱ्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, 'मी नागपूर जिल्ह्याच्या मतदारसंघनिहाय दौरा करतोय. मी तालुक्यांचा संपूर्ण आढावा घेत आहे. केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना, सरकार आपल्या दारी योजनेची माहिती, घरकुलाच्या योजना आहेत, लोकांचे वैयक्तिक प्रश्न आणि अडचणी याचा आढावा घेतला आहे. या आढाव्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतात'.

Devendra Fadnavis News
Raj Thackeray News: मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवर राज ठाकरेंनी ठेवलं बोट; म्हणाले...

'काही ठिकाणी कामाची प्रगती धिमी आहे. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. येत्या काळात या बैठकीमुळे जे अधिकारी मागे राहिले आहे, ते जोमाने काम करतील. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल आम्हाला सादर करावे अशा सूचना केल्या आहेत, असे फडणवीस म्हणाले.

'काही नगरपालिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामांची प्रगती अतिशय धिमी आहे, असेही ते म्हणाले. अधिकाऱ्यांच्या कामाच्या प्रगतीवर देवेंद्र फडणवीस आता कारवाई करतील, हे पाहावे लागणार आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com