Viral Auto Driver Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेवटी बापाचं काळीज! मुलीच्या भवितव्यासाठी वडिलांची धडपड, सोबत घेऊन चालवतो रिक्षा; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

Viral Auto Driver Video: सोशल मीडियावर सध्या एक भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका वडिलांचा संघर्ष दाखवला आहे, जो आईच्या निधनानंतर आपल्या मुलीच्या भविष्यासाठी झगडत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. यामध्ये कधी गमतीदार व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ हे इमोशनल असतात. असाच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ इतका भावनिकल आहे की तुमचंही मन भरून येईल.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्रवासी ऑटो रिक्षात प्रवास करतोय. यावेळी रिक्षात बसल्यानंतर त्याला एक लहान मुलगी सीटच्या मागे असलेल्या जागेमध्ये झोपलेली दिसते. त्या मुलीला पाहून प्रवासी आश्चर्यचकित होतो आणि ड्रायव्हरला विचारतो. यावेळी रिक्षा चालत जे उत्तर देतो त्यावरून तोही इमोशलन होतो.

रिक्षात झोपलेल्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

यावेळी रिक्षा चालक सांगतो की, मागे जी मुलगी झोपली ती त्याचीच मुलगी आहे. त्याच्या पत्नीचं म्हणजे मुलीच्या आईचं निधन झालं असून तो सिंगल पॅरेंट आहे. तो एकटाच तिची देखभाल करतो. मुलीचं नाव आयुषी असून घरी तिची काळजी घेणारं कोणी नाही त्यामुळे तो तिला रिक्षातच त्याच्या सोबत ठेवतो.

चिमुकली आयुषी चालत्या ऑटोमध्ये गाढ झोपेत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय. हे दृश्य एका एका वडिलांचं मुलीवर असलेलं प्रेम दाखवतं. या व्हिडीओमध्ये ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील हास्य आणि थकवा दोन्ही गोष्टी त्याला त्याच्या मुलीची किती काळजी आहे हे दर्शवतात.

या रिक्षा चालकाची कहाणी ऐकल्यानंतर तो प्रवासी आयुषीला ज्यूस प्यायला घेऊन जातो. यावेळी ती मुलगीही खूप खूश असते. हा व्हिडीओ युझर्सना आवडला असून अनेकांनी त्याला लाईकही केलंय.

युझर्सने पाडला कमेंटचा पाऊस

या व्हिडिओवर लोकांनी कमेंट केल्या आहेत. काही जण वडिलांच्या धाडसाचं कौतुक करत आहेत, तर काही जण आयुषीसाठी प्रार्थना करतायत. लोक म्हणतात की हा व्हिडिओ अनेक काम करणाऱ्या पालकांच्या संघर्षांची आठवण करून देतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

UPI Payment: ऑनलाइन पेमेंट करताना यापुढे पिन टाकायची गरज नाही; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

Mugache Cutlet Recipe: झटपट नाश्ता हवा? 10 मिनिटांत बनवा मुगाचे टेस्टी कुरकुरीत कटलेट, वाचा रेसिपी

Maharashtra Vidhansabha Seats: मोठी बातमी! महाराष्ट्रात विधानसभेच्या आता ४३२ जागा होणार?

जहाजावर कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा निघाला दहावी 'फेल'; तथाकथित अंकशास्त्रतज्ञ गणितात नापास

SCROLL FOR NEXT