Diwali Gift Reel Saam Tv
व्हायरल न्यूज

Diwali Gift Reel: सोनपापडी नाही! दिवाळीला असं गिफ्ट दिलं की लोकांनी विचारलं व्हॅकेन्सी आहे का? व्हिडिओ व्हायरल

Viral Office Diwali Gift Reel: दिवाळीनिमित्त अनेक कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून गिफ्ट मिळत आहेत. दरम्यान, एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना थेट सुटकेस बॅग दिल्या आहेत.

Siddhi Hande

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीसाठी अनेकांची खरेदी सुरु झाली आहे. घरोघरी फराळदेखील बनवला जात आहे. दिवाळीसाठी अनेकांना गिफ्ट्सदेखील मिळत आहेत. अनेकांच्या ऑफिसमध्ये मिठाई, वेगवेगळ्या गिफ्ट्स दिले जात आहे. नुकताच एका ऑफिसमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून मोठ्या सुटकेस बॅग दिल्या आहेत.

दिवाळी गिफ्ट

इन्फोएज्ड (Info Edge)या कंपनीने कर्मचाऱ्यांना ही भेटवस्तू दिली आहे. ही एक टेक कंपनी आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या गिफ्ट्सचे फोटो, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर ही बॅग ठेवल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या डेस्कवर VIP ब्रँडच्या सुटकेस बॅग ठेवल्या आहेत. त्याचसोबत मिठाई, दिवादेखील दिली आहे. या मोठ्या बॅगच्या आत आणखी एक लहान बॅग आहे.या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं हे बेस्ट गिफ्ट मिळालं आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'दिवाळी गिफ्ट काय द्यायचं ते यांच्याकडून शिका', 'तुमच्या ऑफिसमध्ये मिळत असेल सोनपापडी, आम्हाला मिळतात' या गोष्टी असा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर असे अनेक रिल्स व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं जात आहे. काहीजणांना एअर फ्रायरदेखील मिळाले आहे. तर रिलायन्स जिओ कंपनीने त्यांना गिफ्ट हॅम्पर दिले आहे. त्यात ड्रायफ्रुट्स आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोनपापडी गिफ्ट म्हणून दिली आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

SCROLL FOR NEXT