Swanandi Berde: अभिनय, दागिन्यांचे ब्रँड ते कायद्याचं शिक्षण...; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा प्रेरणादायी प्रवास

Swanandi Berde: अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री स्वानंदी बेर्डे आता करिअरमध्ये नवा प्रवास सुरू करत आहे. तिने अलीकडेच दागिन्यांचा स्वतःचा ब्रँड ‘कांतप्रिया’ सुरू केला आहे.
Swanandi Berde
Swanandi BerdeSaam Tv
Published On

Swanandi Berde: अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री स्वानंदी बेर्डे आता करिअरमध्ये नवा प्रवास सुरू करत आहे. तिने अलीकडेच दागिन्यांचा स्वतःचा ब्रँड ‘कांतप्रिया’ सुरू केला असून या ब्रँडचं नाव आई-वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. स्वानंदीला दागिन्यांची नेहमीच आवड होती आणि स्वतः काहीतरी वेगळं घालण्याची तिची आवड लक्षात घेऊन इतरांनाही ते वेगळेपण अनुभवता यावं, यासाठी तिने हा व्यवसाय निवडला.

स्वानंदीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शक्ती टॉकया कार्यक्रमात सकाळ प्रिमियरला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या नव्या इनिंगबद्दल मनमोकळं बोलताना सांगितलं की, “करिअरमध्ये काहीतरी वेगळं करायचंय अशी सतत इच्छा होती. त्यामुळे अभिनयासोबत मी नवीन क्षेत्रात उतरायचं ठरवलं आणि माझा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला.”

Swanandi Berde
India VS Pakistan Final: 'ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन तिलक...'; भारताच्या विजयावर मराठी कलाकारांचं सेलिब्रेशन

‘कांतप्रिया’ – आई-वडिलांच्या नावाचा वारसा

तिने आपल्या आई-वडिलांच्या नावावरून या ब्रँडचं नामकरण केलं असून ‘कांतप्रिया’ या नावाला आपल्या जवळीलं नाव असल्याचे सांगितले आहे. “आपण जे काही वेगळं घालतो, ते लोकांनीही अनुभवायला हवं, म्हणून हा ब्रँड सुरू केला, म्हणून या ब्रँडची सुरुवात केली. या नावासाठी तिने अंकशास्त्र आणि ज्योतिषीय गणितांचाही विचार केला, कारण तिच्या मते नाव हे सकारात्मक उर्जेचं प्रतीक असावं. म्हणूनच तिने तिच्या ब्रँडसाठी वडिल लक्ष्मीकांत बेर्डे आणि आई प्रिया बेर्डे यांच्या नावातील अक्षरांनी कांतप्रिया हे नाव ठेवले.

Swanandi Berde
Prasad Oak: 'शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं...'; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची 'शतकपूर्ती', अभिनेता म्हणाला...

लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतच्या लहानपणीच्या आठवणी

मुलाखतीदरम्यान ती आपल्या लहानपणीच्या खास आठवणी सांगताना म्हणाली की, “लहान वयातच मला माझे बाबा दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मला अभिनयाची खरी गोडी लागली. त्या आठवणी आजही माझ्यामनात ताज्या आहेत.”

अभिनयासोबत नवा व्यवसाय आणि शिक्षण

अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर आता स्वानंदीने ज्वेलरी व्यवसाय सुरू केला आहे. यासोबतच ती लवकरच कायद्याचं शिक्षण (Law studies) घेणार आहे. तिच्या मते कायद्याचं शिक्षण हे स्वतःला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवतं. “आपण करिअरमध्ये कितीही काम केलं तरी ज्ञान मिळवलं की आपण अजून सक्षम होतो, म्हणून मी ही दिशा निवडली,” असं ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com