Girls Fight Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Girls Fight Video: केस ओढले, खाली पाडले; दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी; VIDEO VIRAL

Delhi Girls Fight Video: सध्या सोशल मीडियावर दिल्ली विद्यापीठाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ दोन मुलींमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कॉलेजचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कॉलेज फेस्ट, कॅन्टीन किंवा अभ्यासाचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कॉलेजमध्ये मुलं काय धमाल करतात हे ते व्हिडिओतून दाखवत असतात. कॉलेजमधील भांडणाचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कॉलेजमधील अशाच भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली विद्यापीठात दोन मुलींमध्ये जोरदार भांडणे झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत मुलींचे दोन गट दिसत आहे. त्यातील दोन मुलींमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहे. दोन मुली एकमेकांना मारताना दिसत आहे. एका मुलीने तर चक्क दुसऱ्या मुलीचे केस ओढले. तिला खाली पाडले आणि तिला मारहाण करताना दिसत आहे. दुसरी मुलगीही तिला जोरात मारताना दिसत आहे. या मुलींच्या आजूबाजूला इतर मुलींची गर्दी असल्याने त्यांनाही या गोष्टीची त्रास होत आहे. इतर मुली त्यांचंं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु या मुलींची भांडणे थांबतच नव्हती. या दोघींनी एकमेकांना जबरदस्त मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Arhantt_pvt या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'कॉलेजच्या मुली असं कसं करु शकतात', 'आता शाळा कॉलेजमध्ये हेच पाहायचे बाकी होते', 'कॉलेजमध्ये शिक्षण सोडून हे काय सुरु आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : रमीच्या डावामुळे माणिकराव कोकाटेंचे खातं जाणार? कुणाला मिळणार कृषिमंत्रीपद?

Aadhaar, PAN Card भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही; कोणत्या कागदपत्राद्वारे सिद्ध होणारं तुमचं नागरित्व? जाणून घ्या

Share Market: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनं आधी गडगडला नंतर सावरला; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये उसळी

Maharashtra Live News Update: - बीडच्या वडवणी शहरात मंत्री इंद्रनील नाईक यांचे जंगी स्वागत

Bitter Gourd: कडू कारले खाण्याचे जबरदस्त आरोग्य फायदे

SCROLL FOR NEXT