Crocodile Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Crocodile Viral Video:बाबो! दहा फूट लांब मगर रस्त्यावर आली; थरारक दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

Crocodile On Street: उत्तर प्रदेशमधील एका कालव्यातून मगर बाहेर आली आहे. ही १० फूट मगर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मगर म्हटल्यावर सर्वांनाच भीती वाटते. मगर ही खूप मोठी असते. मगरीची अनेकांना भीती वाटते. मगर ही आपण एखाद्या उद्यानात, जंगलात किंवा पाण्यात पाहतो. परंतु तुम्ही कधी जमिनीवर मगर पाहिली आहे का? उत्तर प्रदेशमधील एका रस्त्यावर मगर फिरताना दिसली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी एका कालव्यातून मगर रेंगाळत बाहेर आली होती. अचानक मगर जमिनीवर आल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही मगर साधारण १० फूट आहे. या मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तरप्रदेशमधील बुलंद शहरातील नरोर घाटाजवळील गंगा कालव्यातून ही मगर बाहेर आली होती. ही मगर रस्त्यावर दिसल्यावर स्थानिक लोकांनी मगरीला पकडण्यासाठी पोलिसांना आणि वनविभागाला कळवले. या मगरीची व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत १० फूट मगर ही बाजूच्या कालव्यातून बाहेर आलेली दिसत आहे. ही मगर पुन्हा एकदा त्या कालव्यात जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कालव्याच्या शेजारी लोखंडाचे रेलिंग असल्याने मगरीला पुढे जाताच येत नाहीये. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मगरीची माहिती मिळताच वनविभाग अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पुन्हा कालव्यात सोडले आहे. मगरीची सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT