Chole Bhature Viral Post: छोले भटुरे खा अन् वजन कमी करा! दिल्लीतील दुकान आहे तरी कुठे? पाहा व्हिडिओ

Viral Poster Of Chole Bhature: सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात छोले- भटुरे खाऊन तुम्ही वजन कमी शकता, असं सांगण्यात आलं आहे.
Chole Bhature Viral Post
Chole Bhature Viral PostSaam Tv
Published On

आजकाल प्रत्येकजण आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो. आपण चांगले दिसावे, शरीर निरोगी राहावे. यासाठी अनेकजण डाएट करतात. डाएट करताना फास्ट फूड, तेलकट, तुपाचे पदार्थ खायचे नसतात. डाएट करताना अनेकांना आपले आवडीचे पदार्थ खायला मिळत नाही. अनेकजण पाणीपुरी, छोले भटुरे, वडापाव असे पदार्थ वर्षानुवर्षे खात नाही. परंतु तुम्हाला कोणी सांगितले की, छोले भटुरे खाऊन तुम्ही वजन कमी करु शकता तर? आश्चर्याचा धक्का बसेल ना. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आपण छोलो भटुरे खालल्याने वजन वाढते. तेलकट खालल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो, असं ऐकलं असेल. मात्र, दिल्लीतील एका हॉटेलमध्ये चक्क छोले भटुरे खाऊन वजन कमी करु शकता, असा बोर्ड लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पोस्टर दिल्ली गोपालजींच्या छोले-भटुरेंच्या दुकानात लावण्यात आले आहे. छोले भटुरे खालल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन वाढते. परंतु छोले भटुरे खालल्याने वजनदेखील कमी होऊ शकते, असा पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 'छोले भटुरे खा, वजन कमी करा आणि आजारांपासून सुटका', असं लिहण्यात आले आहे.

Chole Bhature Viral Post
Viral Video: महागात पडला रील! मास्तरीन बाईंनं पेपर तपासताना बनवला रील; व्हायरल होताच झाली FIR

या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अरे व्वा! म्हणजे आता डाएटसाठी स्पेशल छोले भटुरे, वजन कमी करण्यासाठी असेल तर ग्राहकांच्या रांगा लागतील. मार्केटिंग साठी खरच भारी आयडिया, अशा कमेंट्स या पोस्टवर आल्या आहे.

Chole Bhature Viral Post
Viral Audio Clip: कृषी अधिकाऱ्याचा उद्दामपणा! शेतकऱ्यासोबतच्या फोनवरील संवादाची 1 मिनिटाची ऑडिओ क्लिप ऐकाच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com