सोशल मीडियामुळे अनेकांचं आयुष्य बदलून गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक गोरगरीब कलाकारांना मोठ्या संधी चालून आल्या आहेत. मात्र, याच सोशल मीडियामुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाल्याचे उदाहरणे आहेत. याच सोशल मीडियामुळे काही जोडप्यांचे घटस्फोट देखील झाले आहेत. याच सोशल मीडियाचा फटका कंपनीच्या सीईओला देखील बसला आहे. सोशल मीडियामुळे कंपनी सीईओचं लफडं साऱ्याला जगाला कळालं.
बोस्टनमध्ये गिलेट स्टेडियमध्ये प्रसिद्ध बँड कोल्डप्लेचा कॉन्सर्ट सुरु होता. त्याचवेळी गायक क्रिस मार्टिनने किस कॅमेरा सुरु केला. हा कॅमेरा हजारो प्रेक्षकांपैकी एका जोडप्यावर येऊन थांबतो. त्यानंतर या जोडप्याला किस घ्यावं लागतं. कोल्डप्लेदरम्यान हा कॅमेरा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आणि त्याच्या गर्लफ्रेंडवर येऊन थांबला. क्रिस मार्टिनने दोघांना उद्देशून भाष्य केलं. त्यानंतर दोघे तोंड लपवून पळाले. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोल्डप्लेच्या कॉन्सर्टदरम्यान किस कॅमेऱ्यामधील जोडपं बड्या कंपनीतील कर्मचारी आहेत. डेटा-सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्याच कंपनीच्या 'चीफ पीपल ऑफिसर' क्रिस्टिन कॅबोट असे दोघे होते. दोघे विवाहित असून त्यांचं लपून छपून प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र, कोल्डप्ले कॉन्सर्टच्या कॅमेऱ्याने दोघांचा खेळ केला.
कॅमेरा अचानक समोर येऊन थांबल्याने क्रिस्टिन कॅबोटने तोंडावर हात ठेवून पळ काढला. अँडी बायरनने भिंतीच्या मागे लपला. दोघांचा कोल्डप्ले कॉन्सर्टमधील व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. अँडी बायरनचं लग्न झालेलं असून बायकोचं मेगन किरिगन असं आहे. बायरनला दोन मुले आहेत. अँडी बायरनची गर्लफ्रेंड क्रिस्टिनने २०२२ साली घटस्फोट झाला आहे. अँडी बायरन विवाहित असल्याने त्यांच्या प्रेमप्रकरणाची जगभर चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.