Maharashtra Politics : जिल्हाप्रमुख विकणे आहे, ठाकरे सेनेचं होर्डिंग; राजकीय चर्चांना उधाण, VIDEO

Chadrapur News : आता बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यात लागलेल्या एका राजकीय होर्डिंगची... या होर्डिंगवर चक्कं जिल्हाप्रमुखपद विकणे आहे, असं म्हटलंय.. मात्र हे होर्डिंग कुणी लावलंय? आणि होर्डिंगच्या माध्यमातून कुणावर निशाणा साधलाय? पाहूयात...
chandrapur news
chandrapur Saam tv
Published On

10 ते 25 लाख रुपयात जिल्हाप्रमुख विकणे आहे... या आशयाचं हे होर्डिंग लागलेत चंद्रपूरच्या वरोरा आणि भद्रावती शहरात.....याच होर्डिंगमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय....

chandrapur news
Uddhav Thackeray-Eknath Shinde : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये, दोघांत फक्त एका खुर्चीचं अंतर

खरंतर या होर्डिंगसाठी कारण ठरलंय ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदेंनी भाजपात केलेला पक्षप्रवेश.....रवींद्र शिंदे हे संजय राऊतांचे निकटवर्तीय.. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही रवींद्र शिंदेंना जिल्हाप्रमुख पद देण्यात आल्याची चर्चा रंगली होती..त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला होता...मात्र आता रवींद्र शिंदेंनीच पक्ष सोडल्यानंतर शिंदे सेनेने होर्डिंग लावून संजय राऊतांना डिवचलंय.. 10 ते 25 लाख रुपये घेऊन जिल्हा प्रमुखपद विकण्यात आल्याचा आरोप होर्डिंगमधून करण्यात आलाय....

chandrapur news
Latur : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांची भरली शाळा, काय संपूर्ण प्रकरण? वाचा

शिवसेनेच्या फुटीनंतर 50 खोके एकदम ओके म्हणत शिंदे सेनेच्या आमदारांवर हल्लाबोल केला जात होता... मात्र आता जिल्हा प्रमुख पदासाठी 10 ते 25 लाख घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय.. त्यामुळे पदांसाठी पैसे देणं घेणं स्थानिक पातळीपर्यंत झिरपलं आहे का? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com