Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : प्री-वेडिंग फोटोशूटच्या नादात नवरा-नवरीची फजिती; तलावात होडीच पलटली, पाहा VIDEO

Pre Wedding Funny Photoshoot Viral Video : पाण्यात, धबधबा, धरण किंवा मग नदी, समुद्रकिनारे अशा ठिकाणी फोटोशूट करणे सर्वांना आवडतं. अनेक कपल्स अशाच पाण्याच्या ठिकाणी जहाज किंवा छोट्याशा होडीत सुद्धा फोटोशूट करतात.

Ruchika Jadhav

लग्न सोहळ्यात आपण आनंदाचे क्षण आठवणीत रहावेत यासाठी ते कॅमेऱ्यात कैद करतो. त्यासाठी व्हिडिओ आणि फोटोग्राफर बोलवले जातात. अशात सध्या एक वेगळंच ट्रेन्ड सुरू आहे. सर्वजण लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करतात. प्री वेडिंग फोटोशूटसाठी कपल्स विविध थीम ठरवतात. त्यात काही हस्स्यास्पद किस्से सुद्धा घडतात. असाच एक मजेशीर प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाण्यात, धबधबा, धरण किंवा मग नदी, समुद्रकिनारे अशा ठिकाणी फोटोशूट करणे सर्वांना आवडतं. अनेक कपल्स अशाच पाण्याच्या ठिकाणी जहाज किंवा छोट्याशा होडीत सुद्धा फोटोशूट करतात. एका जोडप्याने देखील असं फोटोशूट करायचं ठरवलं. त्यासाठी ते दोघेही मस्त तयार झाले. ब्राइडने सुंदर साउथ इंडियन स्टाइल साडी नेसली आहे. तर ग्रूमने देखील ट्रेडिश्नल आउटफीट वेअर केलं आहे.

सुंदर आउटफीटमध्ये हे दोघेही एका तलावात गेलेत. तलावामध्ये त्यांनी एक छोटी होडी ठेवली आहे. आता या होडीमध्ये बसून त्यांना मस्त फोटोशूट करायचंय. मात्र त्यात या दोघांची चांगलीच फजिती झालीये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला ग्रूम या होडीमध्ये जातो. त्यानंतर ब्राइड देखील होडीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते.

लाकडाची होडी आधीच नवरदेवाच्या वजनाने उलटण्याच्या तयारीत असते. त्यात नवरी सुद्धा येते तेव्हा दोघांना स्वत:ला बॅलेन्स करता येत नाही आणि होडी पाण्यात उलटली जाते. होडीसह ब्राइड आणि ग्रूम सुद्धा पाण्यात पडतात. फोटोशूट आधीच दोघेही पाण्यात भिजतात. दोघेही पाण्यात पडल्यावर एकच हशा पसरतो. या दोघांचा हा मजेशीर क्षण तेथील व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे इमोजी आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भर पावसात पाण्यात आणि तेही छोट्याशा होडीत फोटोशूट करण्याचा या जोडप्याचा प्लान चांगलाच फसला आहे. @uthram_wedding_films या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT