Groom Died on Marriage Day: नवरीसोबत रूममध्ये गेला अन् भयानक घडलं; लग्नानंतर काही वेळातच नवरदेवाचा मृत्यू

Groom Died on Marriage Day: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Groom Died on Marriage Day
Groom Died on Marriage DaySaam TV
Published On

Groom Died on Marriage Day: थाटामाटात लग्न लागलं वऱ्हाडी मंडळींनी आनंदात जेवण केलं. मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला डोलीत बसवून निरोप दिला. त्यानंतर नवरदेव नवरीला घेऊन आपल्या गावी सुद्धा आला. घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर नवरदेवाकडील मंडळी खूश होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. अशातच नवरीसोबत रुममध्ये गप्पा मारत असताना नवरदेवाची अचानक तब्येत बिघडली. (Latest Marathi News)

Groom Died on Marriage Day
Women Police: महिला पोलिस सराईत गुन्हेगाराच्या प्रेमात पडली अन् अडकली; नेमकं काय घडलं?

तो चक्कर येऊन खाली पडला. आरडाओरड झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. काळजाचा ठोका चुकवणारी ही थरारक घटना बिहारमधील भागलपूरमध्ये घडली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

विनीत प्रकाश असं मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचं नाव असून तो दिल्लीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. लग्नानंतर अवघ्या काही वेळातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याने नवरीला सुद्धा मोठा धक्का बसला आहे. तिची सुद्धा तब्येत बिघडली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बिहामधील छोटी खंजरपूर येथील रहिवासी मुकुंद मोहन झा यांचा अभियंता मुलगा विनीत प्रकाश याचं लग्न झारखंडच्या चाईबासा येथील रहिवासी जन्मजय झा यांची मुलगी आयुषी कुमारीशी ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे गुरूवारी दोघांचही लग्न थाटामाटात लागलं. पाहुण्यामंडळींनी वधू-वराला आर्शिर्वाद देखील दिले.

Groom Died on Marriage Day
Parbhani News: रात्री मोटार चालू करण्यासाठी शेतात गेला अन् अनर्थ घडला; शेतकऱ्याच्या मृत्युने अख्खं गाव हळहळ

नवरीच्या वडिलांनी आपल्या मुलीला डोलीत बसवून निरोप दिला, त्यानंतर नवरदेव नवरीला घेऊन घरी आला. रात्री पाहुण्यांचा गोंधळ होता. त्यामुळे वधू-वर दोघेही एका खोलीत निवांत गप्पा मारत बसले होते. मात्र अवघ्या काही वेळातच वराची प्रकृती बिघडली. वधूसोबत गप्पा मारत असताना तो अचानक चक्कर येऊन पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनं वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. वधूच्या वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांना संशय आहे की मुलाला आधीपासूनच काहीतरी आजार असेल आणि हे लग्न फसवणूक करून केलं गेलं आहे. याप्रकरणी वधूच्या वडिलांनी मोजाहिदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, वराच्या वडिलांचं म्हणणं आहे की मुलगा निरोगी होता आणि तो दिल्लीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. पण काय झालं हे त्यांना कळू शकलेलं नाही. त्याचवेळी या घटनेनंतर ट्रेनी एएसपी अपराजित लोहन यांनी वराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत. एका बाजूला नवरी लग्नाची अनेक स्वप्ने घेऊन बसली होती. मात्र, दुसऱ्याच क्षणी स्वप्नांचा महाल क्षणार्धात तुटला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com