Women Police: महिला पोलिस सराईत गुन्हेगाराच्या प्रेमात पडली अन् अडकली; नेमकं काय घडलं?

Female Police and Criminal Love Story: ३३ वर्षीय महिला पोलिस अधिकारी एका सराईत गुन्हेगाच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये एका जीममध्ये भेट झाली होती.
Women Police and Criminal Love Story
Women Police and Criminal Love StorySaam TV
Published On

Women Police and Criminal Love Story: प्रेमासाठी कायपण हे वाक्य तुम्ही ऐकलं असेलच. प्रेमात माणूस काय करेल हे सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीवर प्रेम झालं तर तो चांगला की वाईट याचा विचार कधीच महिला करीत नाही. त्यांना आपण योग्य की अयोग्य याचे देखील भान नसते. असाच काहीसा प्रकार अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून समोर आला.

न्यूयॉर्कमधील अॅलिसा बज्राक्टारेविक नामक ३३ वर्षीय महिला पोलिस अधिकारी एका सराईत गुन्हेगाच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये एका जीममध्ये भेट झाली होती. वर्कआऊट दरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले.

Women Police and Criminal Love Story
Dombivali Crime News: दारुने केला घात! तरुणाने बहिणीच्या नवऱ्यालाच संपवलं; डोंबिवलीत खळबळ

दरम्यान, अॅलिसाचा प्रियकर अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतल्याची माहिती अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाला मिळाली. यानंतर तो पोलिसांच्या चांगलाच नजरेत आला. नार्कोटिक्स पथकाने अलिसाला तिचा प्रियकर गुन्हेगार असून त्याच्यापासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता पण तिने ऐकले नाही.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, दोघांनी बऱ्याच वेळ एकमेकांसोबत घातला. यादरम्यान, त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. याची कुणकुण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना लागली. त्यांनी अॅलिसाला तिच्या प्रियकरापासून दूर राहण्यास सांगितलं. यानंतर काही दिवसांसाठी ती प्रियकराच्या दूरही राहिली.

यादरम्यान, तिच्या प्रियकराने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करण्याचा गोरखधंदा सुरूच ठेवला. त्यामुळे पोलिसांनी या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी सापळा रचला. नुकतेच पोलीस महामार्गावर वाहनांची तपासणी करत होते. दरम्यान, त्यांनी अॅलिसाच्या प्रियकराची गाडीही थांबवली आणि त्याची शोधाशोध सुरू केली. हे पाहून अॅलिसाने तेथे वाद निर्माण केला.

Women Police and Criminal Love Story
Parbhani News: रात्री मोटार चालू करण्यासाठी शेतात गेला अन् अनर्थ घडला; शेतकऱ्याच्या मृत्युने अख्खं गाव हळहळ

याच संधीचा फायदा घेत त्याने धूम ठोकली. इतकंच नाही तर अॅलिसाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही ऐकले नाही. अलिसाचे अंमली पदार्थ विक्रेत्याशी गेल्या एक वर्षापासूनचे संबंध असल्याची अंमली पदार्थविरोधी पथकाने वरिष्ठांना दिली. गेल्या वेळी सुद्धा पथकाने अॅलिसाच्या प्रियकराच्या मॅनहॅटनमधील निवासस्थानावर गेछापा टाकला होता.

तेव्हा अॅलिसाने ऑपरेशनमध्ये अडथळा आणला होता. याबाबत तपास अधिकाऱ्यांनी अलिसाला ताकीदही दिली होती. असे असतानाही अॅलिसाचे ड्रग्ज विक्रेत्याशी संबंध सुरूच होते. या संपूर्ण प्रकरणानंतर अॅलिसाला निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे, अॅलिसाला असा विश्वास आहे की तिचा प्रियकर ड्रग डीलर नाही. पोलिसांचा काही गैरसमज झाला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com