Dombivali Crime News
Dombivali Crime NewsSaam TV

Dombivali Crime News: दारुने केला घात! तरुणाने बहिणीच्या नवऱ्यालाच संपवलं; डोंबिवलीत खळबळ

Dombivali Crime: दारू पिऊन शिव्या दिल्याने संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या चक्क पतीची चाकूने वार करत हत्या केली.
Published on

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Dombivali Crime News: डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन शिव्या दिल्याने संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या चक्क पतीची चाकूने वार करत हत्या केली. डोंबिवली खंबाळपाडा परिसरात गुरूवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Dombivali Crime News
Parbhani News: रात्री मोटार चालू करण्यासाठी शेतात गेला अन् अनर्थ घडला; शेतकऱ्याच्या मृत्युने अख्खं गाव हळहळ

मारीकणी तेवर असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी रमेश तेवर याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाळपाडा परिसरात मारीकणी तेवर हे आपल्या कुटुंबासह राहतात. इडली विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. (Breaking Marathi News)

मारीकणी यांना दारूचे व्यसन होतं. गुरूवारी दुपारच्या सुमारास मारिकनी हे दारू पिऊन घरी आले. त्यांनी सासरच्या लोकांना शिवीगाळ (Crime News) करण्यास सुरूवात केली. यावेळी मेव्हणा रमेश तेवर याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Dombivali Crime News
Pune News: हृदयद्रावक! खेळता-खेळता दीड वर्षाचं बाळ शेततळ्यात पडलं; वाचवायला गेलेल्या बापाचाही मृत्यू

मात्र मारीकणी काही ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रमेशने मारीकणी याच्यावर चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यात मारीकणी याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात रमेश तेवर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com