Omkar Bhojane Dance Video
Omkar Bhojane Dance VideoSaam Tv

Omkar Bhojane Dance Video: हास्यजत्रेतील ओमकार भोजनेने 'चंद्रा' गाण्यावर केली जबरदस्त लावणी; डान्स पाहून तुम्हीही माराल शिट्ट्या;VIDEO VIRAL

Omkar Bhojane Dance On Chandra Song: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओमकार भोजने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. ओमकार भोजनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओमकार भोजनेने चंद्रा या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
Published on

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओमकार भोजनेची सोशल मीडियावर खूप जास्त चर्चा असते. ओमकार भोजने नेहमी आपल्या कॉमेडीने चाहत्यांना खळखळून हसवत असतो. ओमकार भोजने आतापर्यंत कॉमेडी शो, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुम्ही ओमकार भोजनेचा डान्स कधी पाहिलायत का? ओमकार भोजनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने चंद्रा या गाण्यावर नऊवारी साडी नेसून जबरदस्त डान्स केला आहे.

Omkar Bhojane Dance Video
Viral Video : मगरीच्या जबड्यात त्याने डोकं ठेवलं; पुढे जे घडलं ते भयंकरच, काळजाची धडधड वाढवणारा VIDEO व्हायरल

ओमकार भोजनेने अमृता खानविलकरच्या 'चंद्रा' या गाण्यावर अगदी सेम टू सेम डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत सर्वप्रथम ओमकार भोजने स्टेजवर एन्ट्री घेतो.त्याने काळ्या रंगाची नऊवारी नेसून त्यावर साजेशी ज्वेलरीदेखील घातली आहे. त्याचा हा लूक पाहून प्रेक्षकांना धक्काच बसतो. यानंतर ओमकार भोजनेचा डान्स पाहून प्रेक्षक खूपच आश्चर्यचकित होतात.

व्हायरल व्हिडिओत ओमकार भोजने 'चंद्रा' गाण्यावर डान्स करत एन्ट्री घेतो. त्यानंतर ओमकार भोजने चंद्रा गाण्यावर जबरदस्त स्टेप्स करतो. हुबेहुब अमृता खानविलकरने केलेल्या डान्ससारख्याच स्टेप्स ओमकारने केल्या आहेत. ओमकारची ही लावणी बघूण प्रेक्षकांमध्ये बसलेले स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, भरत जाधव यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. ओमकारचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Omkar Bhojane Dance Video
Viral Video : जीममध्ये डोले-शोले बघून पोरगी आधी इम्प्रेस झाली, पोरानं असं काय केलं की नंतर लाजून झाली चूर, Funny Video

ओमकार भोजने सध्या कलर्स मराठीवरील 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कार्यक्रमात काम करत आहे. या कार्यक्रमातूनदेखील तो प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे.

Omkar Bhojane Dance Video
King Cobra Viral Video : अरे बापरे! घराच्या बागेत आढळला तब्बल १२ फुटांचा 'किंग कोब्रा' साप; VIDEO पाहून तुमचेही उडतील होश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com