Viral Stunt Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Bike Stunt Video: मस्ती नडली! स्टंटबाजी करताना तोंडावर आपटले, इतक्यात भरधाव ट्रक आला अन्... काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Viral Stunt Video: दुचाकीवरील तिघांपैकी एकाही तरुणाने हेल्मेट घातले नाही. तसेच ते धक्कादायक स्टंटबाजीही करताना दिसत आहेत. काही सेकंदाने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटते अन् गाडी थेट डिव्हायडरवर आदळते.

Gangappa Pujari

Viral Bike Stunt Video:

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या अशाच एका भयंकर स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिन तरुणांना बाईकवर केलेली स्टंटबाजी चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे.

तरुणाईमध्ये बाईक स्टंट (Bike Stunt) करण्याचे वेड नेहमीच पाहायला मिळते. सोशल मीडियावर अशा बाईक स्टंटचे, भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे स्टंट जीवघेणेही ठरतात, ज्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ माध्यमांमध्ये चर्चेत आला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral VIdeo) तीन तरुण एकाच दुचाकीवर सुसाट वेगाने प्रवास करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे रस्त्यावर वाकडी तिकडी गाडी वळवत ते जीवघेणी स्टंटबाजीही करत आहेत. हीच स्टंटबाजी त्यांच्या अंगलट येते अन् तिघेही जोरदार आपटतात. सुदैवाने भरधाव ट्रक त्यांच्या अगदी जवळून गेल्याने तिघांचाही जिव वाचतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकीवरील तिघांपैकी एकाही तरुणाने हेल्मेट घातले नाही. तसेच ते धक्कादायक स्टंटबाजीही करताना दिसत आहेत. काही सेकंदाने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटते अन् गाडी थेट डिव्हायडरवर आदळते. गाडी पडल्यानंतर तिनही तरुण जोरात पडतात.

इतक्यात शेजारून भरधाव ट्रक निघून जातो. ट्रकपासून लांब अंतरावर पडल्याने तिघांचाही जीव वाचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणांना अशाप्रकारे जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT