Madha Lok Sabha Constituency : महादेव जानकरांचा ठरलं, बारामती नव्हे यंदा 'या' मतदारसंघातून लाेकसभा लढणार

महादेव जानकर या निमित्ताने मोठी ताकद दाखवणार असून भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात जानकर यांनी शड्डु ठोकल्याचं‌ पाहायला मिळत आहे.
mahadev jankar to contest lok sabha election from madha constituency
mahadev jankar to contest lok sabha election from madha constituency Saam tv

Satara News :

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (mahadev jankar) हे माढा मतदारसंघातून आगामी लाेकसभा निवडणुक लढविणार आहेत. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात विजयी निर्धार मेळाव्याचे आयोजन येत्या १७ फेब्रुवारीला फलटण येथे केल्याची माहिती रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते म्हणाले राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघात विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला रासपचे नेते महादेव जानकर हे उपस्थित राहणार आहेत.

mahadev jankar to contest lok sabha election from madha constituency
Maratha Samaj Rasta Roko Andolan : एक मराठा लाख मराठा... वैजापूर कन्नड मार्गावर रास्ता राेकाे, वाहतुक विस्कळीत

या मेळाव्याच्या दिवशी सकाळी शिखर शिंगणापुर येथील शंभु महादेवांना अभिषेक घालुन शिखर शिंगणापुर ते फलटण असे शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात येणार आहे असेही शेवते यांनी नमूद केले.  (Maharashtra News)

महादेव जानकर हे स्वत: माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडणुक लढवणार असल्यामुळे या विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

mahadev jankar to contest lok sabha election from madha constituency
Udayanraje-Ramraje Meeting : उदयनराजे-रामराजेंचे तुझ्या गळा माझ्या गळा... या भेटीमागे दडलंय काय? (पाहा व्हिडिओ)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com