CCTV Camera Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV Camera: दिवसाढवळ्या अलिबागमध्ये गुंडाराज; लाथा-बुक्क्या, बांबू आणि दगडांनी तरुणाला बेदम मारहाण

Crime News: मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून बांधकाम साहित्य पुरवण्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे जखमी तरुणाचे म्हणणे आहे. झिराड परिसरात फार्म हाऊस डेव्हलपिंगसाठी बंगल्यांची बांधकामे सुरू आहेत.

Ruchika Jadhav

Alibag Crime News:

अलिबागमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाला 8 ते 10 जणांनी मिळून भररस्त्यात मारहाण केली आहे. भाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सदर घटनेत मारहाण झालेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अभिराज पाटील असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरुयेत. मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून बांधकाम साहित्य पुरवण्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे जखमी तरुणाचे म्हणणे आहे.

झिराड परिसरात फार्म हाऊस डेव्हलपिंगसाठी बंगल्यांची बांधकामे सुरू आहेत. तिथं बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम स्थानिकांना मिळावे यासाठी संघर्ष सुरू होता. यातून स्थानिक तरुणाला मारहाण झाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण बाजारपेठेत असाताना अचानक ९ ते १० जण त्याच्या दिशेने धावत आले. त्यानंतर त्यांनी तरुणावर लाकडी काठ्यांनी, दगडाने आणि बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी बाजारात मोठी गर्दी होती. वाहनांची देखील येजा सुरू होती. मात्र कोणीही या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

तरुणाला रुग्णालयात दाखल केले असून त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. कामाचे काँट्रॅक्ट त्या व्यक्तींना हवे असते. जर मालकाने हे काम इतर कुणाला दिले तर हे लोक अशाच पद्धतीने मारहाण करतात आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात, असं तरुणाने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT