CCTV Video: भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याचा लहान मुलावर हल्ला; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Stray Dog Attack On Child: कुत्र्यांची दहशत पसरलेली असताना आता पुन्हा एकदा एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आलीये. कुत्र्यांच्या हल्ल्याचा भयंकर व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
CCTV Video
CCTV VideoSaam TV
Published On

विजय पाटील

Sangli News:

सांगलीमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांमुळे नागरिकांना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कुत्र्यांची दहशत पसरलेली असताना आता पुन्हा एकदा एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आलीये. कुत्र्यांच्या हल्ल्याचा भयंकर व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

CCTV Video
Sangali News: उसतोड कामगारांच्या झोपडीवर चोरट्यांचा डल्ला; झोपडीतून मिठ, मिरची आणि तेल लंपास

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मिरज शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरी वस्तीमध्ये चौका-चौकात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या ठाण मांडून बसलेल्या पाहायला मिळतात. महापालिका प्रशासन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे.

अशात समता नगर अकसा मशीद जवळ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका ४ वर्षाच्या लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, मुलगा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांजवळ उभा असतो. तेव्हा एक कुत्रा त्याच्या जवळ येतो आणि अंगावर भुंकू लागतो. त्यानंतर मुलगा झाडीमध्ये थोडा आत जातो. त्यानंतर ४ ते ५ कुत्रे त्याच्या मागे धावत येतात. मुलगा पूर्णत: घाबरतो आणि पळू लागतो.

ही घटना घडते त्यावेळी काही व्यक्ती त्याच रस्त्यावर उभे असतात. मुलाचा आवाज ऐकून सर्वजण त्याच्याजवळ येतात आणि कुत्र्यांच्या टोळक्यातून त्याची सुटका करतात. सुदैवाने नागरिक जवळ असल्याने मुलगा कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून आता नागरिकांनी महापालिका प्रशासनवर संताप व्यक्त केला आहे. एखादा निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.

CCTV Video
Mumbai Crime: अंधेरी परिसरात नायजेरियन पेडलरला अटक; १.२५ कोटी रुपयांचं अमली पदार्थ जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com