सचिन कदम
अलिबाग : नोकरी लावून देण्याचा बहाणा, कॉलेजला प्रवेश घेऊन देण्याच्या नावाने फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार (Alibag) अलिबागमध्ये समोर आला असून मेडीकल कॉलेजला ॲडमिशन मिळवून देण्याच्या नावाने अनेकांची (Fraud) फसवणूक झाली आहे. फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. (Live Marathi News)
अलिबाग येथील मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवुन देतो असे आमिष दाखवून ३२ लाख ५० हजार रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील अभिजीत वानिरे यांच्या मुलीला अलिबागच्या मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देतो असे सांगून या टोळक्याने ३२ लाख ५० हजार रूपये उकळले होते. या टोळीतील चार जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ दास, सोमेन मन्ना, सोमेश बिरा आणि अभिषेक कुमार रज्जाक अशी आरोपीतांची नावे आहेत.
२५ लाखाचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून २० लाखांची रोकड आणि मोबाईल, एक गाडी मिळून २५ लाखांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांचे अन्य तीन साथीदार अद्याप फरार असून पकडलेल्या आरोपींना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.