Nandurbar News: ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका भंगार अवस्थेत; दोनच दिवसात पडली बंद

Nandurbar News : ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका भंगार अवस्थेत; दोनच दिवसात पडली बंद
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे याकरिता ग्रामीण रुग्णालयांमध्ये १०२ व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु या (Ambulance) रुग्णवाहिका बंद असल्या तर रुग्णांना तात्काळ रुग्णालयात पोहचविणे शक्य नाही. अशीच स्थिती नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात आहे. येथे असलेली रुग्णवाहिका गेल्या दोन महिन्यापासून बंद अवस्थेत पडली आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Nanded Civil Hospital: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच; नवजात बालकानंतर आईचाही मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दोन महिन्यापासून १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. गेल्या दोन महिन्यापासून रुग्णवाहिकेची मागणी असून काही दिवसांपूर्वी रुगवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून या ही रुग्णवाहिका अवघ्या दोनच दिवसात तीन तेरा झाले. रुग्णवाहिकेच्या इंजिनमधून ऑइलची गळती लागली असल्याने त्यात बिघाड झाला. यासोबतच रुग्णवाहिकेचे टायर देखील खराब अवस्थेत दिसून आला. 

Nandurbar News
Jalgaon Accident News: रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे महिलेचा मृत्यू; दुचाकी घसरून झाला अपघात

खराब रुग्णवाहिकेत ग्रामीण नागरिकांचे जीव वाचणार तरी कसे? असा प्रश्न आता स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. खांडबारा ग्रामीण रुग्णालय ३० ते ४० खेड्यापाड्यातील गरीब आदिवासी बांधव उपचार घेण्यासाठी येतात. तसेच खांडबारा परिसरात मोठ्या प्रमाणावर अपघाताची संख्या असल्याने गरीब आदिवासी बांधवांसाठी जीवनदायी मानली जाते. दिलेली भंगार १०८ रुग्णवाहिका बदलून दर्जेदार रुग्णवाहिका देण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com