Nanded Civil Hospital: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच; नवजात बालकानंतर आईचाही मृत्यू

Nanded News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच; नवजात बालकानंतर आईचाही मृत्यू
Nanded Civil Hospital
Nanded Civil HospitalSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्याने शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे (Nanded) नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सुरु असलेले मृत्यूचे तांडव अजूनही सुरूच आहे. आज पुन्हा एका मातेचा मृत्यू (Death) झाला आहे. यामुळे येथील मृतांची संख्या आता ३३ झाली आहे. (Latest Marathi News)

Nanded Civil Hospital
Pimpri Chinchwad Crime: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध; प्रियकराकडून पतीची हत्या, पिंपरी चिंचवड शहरातील घटना

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांना औषधी मिळू शकत नाही. परिणामी अत्यव्यस्थ असलेल्या रुग्णांचा रुमत्यू होत आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत असताना प्रशासनाकडून अदयाप सुधारणा करण्यात आली नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी देखील दाखल रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

Nanded Civil Hospital
Pandharpur News: कार्तिकीच्या महापूजेला फडणवीस की पवार; पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीपुढे पेच

प्रसूत झालेल्या महिलेचा मृत्यू 

आज रुग्णालयात २२ वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली. अखेर आज महिलेचा मृत्यू झाला. शनिवारपासून महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी उपाचाराबाबत काही माहिती दिली नाही. सर्व औषधी आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या. त्यासाठी ४० ते ४५ हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली. आज महिलेचा मृत्यू झाला. बाळ आणि नंतर आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com