Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: कुटुंबासाठी पायलटने केलं नको कृत्य, कॉकपिटचा दरवाजा उघडला अन् प्रवाशांचा जीव घातला धोक्यात

लंडन ते न्यूयॉर्क या ब्रिटिश एअरवेजच्या उड्डाणादरम्यान पायलटने कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवला. प्रवासी व क्रू मेंबर्स घाबरले. या धक्कादायक घटनेनंतर पायलटला निलंबित करण्यात आले.

Manasvi Choudhary

अनेकदा प्रसिद्धीसाठी व्यक्ती नको ते स्टंट करतात ज्यामुळे प्रसिद्धीच नाही तर जीवाला धोका पोहचतो. विमान चालवताना वैमानिकाची जबाबदारी मोठी असते. प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा हे मुख्य लक्ष असते. वैमानिकाकडून जर विमान सुरू असताना एखादी चूक झाली तर विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात. ब्रिटनमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो पाहून तुमचाही जीव घाबरून जाईल.

लंडनच्या हीथ्रोहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या विमानात वैमानिकाने जे केलं आहे ते पाहून विमानातील प्रवासी घाबरले आहेत. या पायलटने उड्डाणादरम्यान कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवला. पण हे वैमानिकाकडून चुकून झाले नाही तर हे त्याने जाणूनबुजून केले आहे. वैमानिकाला तो एक उत्कृष्ट पायलट असल्याचे त्यांच्या कुटुंबियाना दाखवून द्यायचे होते. मात्र यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अपहरण तसेच दहशतवादाचा धोका कमी करण्यासाठी संपूर्ण उड्डाण प्रवासात कॉकपिटचे दरवाजे सहसा बंद ठेवले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टनला त्याच्या कुटुंबाने, विमान प्रवासादरम्यान कॉकपिटचा ताबा घेताना पाहावे म्हणून त्याने हे केलं आहे. दरम्यान, ब्रिटिश एअरवेजच्या पायलटवर 'दहशतवादविरोधी कायद्यांचे उल्लंघन' केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवण्याची पायलटची कृती प्रवाशांना तसेच क्रू मेंबर्सनाही घाबरवणारी होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'ब्रिटिश एअरवेजचे सहकारी इतके चिंतेत होते की पायलटची अमेरिकेत तक्रार करण्यात आली आणि अधिकाऱ्यांना त्याला निलंबित करावे लागले.' ब्रिटिश एअरवेजच्या विमानातील क्रू मेंबर्सनी एअरलाइनला पायलटच्या कृतीची माहिती दिली. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेची तात्काळ चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे रवींद्र धंगेकर देणार उद्या जैन बोर्डिंगला भेट

इतिहास, साहस आणि पर्यटनाचा संगम; रायगड किल्ल्यावर पर्यटकांचा उत्साह ओसंडला|VIDEO

Shocking : धक्कादायक! खेळताना छतावरून कोसळला; लोखंडी सळई थेट पोटातून आरपार, ५ वर्षीय मुलाची प्रकृती नाजूक

Brain Tumor: 'ही' लक्षणं साधी नसून असू शकतात ब्रेन ट्युमरचे संकेत

Amruta Khanvilkar Photos: ओठावर लाली अन् दिसायला भारी, अमृताचे फोटो पाहून तरूण घायाळ

SCROLL FOR NEXT