

टीम इंडियाचे चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आला आहे. आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकपचा फायनल सामना आज रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे गोलंदाज वरूण चक्रवर्तीचा आज टीममध्ये समावेश केला जाणार का?
इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनलमध्ये भारतीय स्पिनर वरूण चक्रवर्तीने खराब कामगिरी केली होती. वानखेडेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने ४ ओव्हरमध्ये ६४ रन्स दिले. नॉकआऊटच्या सामन्यांमध्ये हा स्पेल खूपच खराब मानला जातो.
सुपर ८ चे सामने सुरु झाल्यापासून वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीत घसरण पाहायला मिळाली. त्याने एकूण सुपर ८ च्या सामन्यांमध्ये केवळ ४ विकेट्स घेतले. सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याची खूप धुलाई केली. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात त्याचा टीममध्ये समावेश होणार का हे पाहावं लागणार आहे.
रविवारी होणाऱ्या फायनल सामन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला वरूण चक्रवर्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सूर्याने स्पष्ट केलं की, टीम मॅनेजमेंटला त्याच्या फॉर्मची कोणतीही चिंता नाहीये आणि टीमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
सूर्या म्हणाला की, वरूणच्या फॉर्मसंदर्भात आम्ही अजिबात चिंतेत नाही. हा आमचा खेळ आहे आणि आमचा फोकस सामना जिंकण्यावर असणार आहे. आम्ही सेमीफायनलचा सामना जिंकला आहे आणि तो जगातील नंबर १ चा गोलंदाज आहे. त्याला माहितीये की, टीमला विजय कसा मिळवून द्यायचा. त्यामुळे बदल होणार की नाही हे सामन्याच्या वेळी आम्ही ठरवू.
सुपर ८ नंतर कामगिरीत घसरण
वरुण चक्रवर्तीने २०२६ च्या टी२० वर्ल्डकपमधील ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली.
सामने: ४
विकेट्स: ९
सरासरी: ६.८८
इकॉनॉमी: ५.१६
सामने: ४
विकेट्स: ४
सरासरी: ४६.५०
इकॉनॉमी: ११.६२
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.