Viral Video: कारला उडवलं नंतर पोलिसांना चकवा; भरधाव वेगात कॅब चालकाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ, Video व्हायरल

Cab Driver Viral Video: नोएडामध्ये कॅब चालकाने पोलिसांपासून पळ काढताना प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. कार सुसाट धावत असल्याने प्रवाशी घाबरले. मुलाच्या रडण्याचा आवाज व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येतो.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये कॅब चालकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांपासून वाचवण्यासाठी कॅब चालकाने कार सुसाट चालवली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ प्रवाशांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे प्रवासी कार थांबवण्याची विनंती करत आहे. परंतु कॅब चालकाने कार सुसाट चालवली आहे.

Viral Video
Stunt Viral Video: बुलेटवर तीन तरूणांची स्टंटबाजी; व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये ही घटना घडली आहे. एक कुटुंब नोएडाहून दिल्लीला जाण्यासाठी कॅबने चालले होते. दरम्यान कॅब चालकाने पोलिसांपासून वाचण्यासाठी कार सुसाट पळवली आहे. कार इतकी सुसाट पळवली की त्यातील प्रवाशी देखील घाबरले आहेत. ते गाडी थांबवण्याची विनंती करत आहेत.

त्यातील एका प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर करत सांगितले की, 'आज मी आणि माझे कुटुंब नोएडाहून सीपीला जात होतो. नोएडामधील पार्थला पुलाजवळ एका पोलिसाने वाहन चालकाला थांबवण्यास सांगितले पण चालकाने वाहन न थांबवता जोरदार पळ काढला आहे.'

खरंतर ही घटना ग्रेटर नोएडा वेस्टच्या पार्थला ब्रिज येथील आहे. येथे पीडित कुटुंब दिल्लीच्या सीपीला जाण्यासाठी कॅबमध्ये चढले. वाटेत पोलिसांनी तपासणी दरम्यान कॅब चालकाला थांबवले पण तो थांबण्याऐवजी बेदरकारपणे गाडी चालवत होता. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कॅब एका कारलाही धडकली. यानंतर, पीडित कुटुंब चालकाला गाडी थांबवण्याची विनंती करत राहिले. व्हिडिओमध्ये घाबरलेल्या मुलाच्या रडण्याचा आवाजही ऐकू येत आहे.

Viral Video
Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

पीडितेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आणि संपूर्ण घटनेबद्दल सांगितले. तथापि, अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. गेल्या काही काळापासून दिल्ली-एनसीआरमध्ये कॅब चालकांच्या मनमानी वर्तनाचे व्हिडिओ समोर येत आहेत. यामुळे कॅबमधील प्रवाशांची सुरक्षितता सतत का कमी होत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांसोबतच कॅब कंपन्यांनीही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com