

अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी वर मोठी कारवाई..
2 किलो 80 ग्राम एमडी जप्त.. नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील घटना..
लालखडी ते सुकडी वनारसी रोडवर दोन युवक एमडी घेऊन जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली
या माहितीच्या आधारावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापडा रचून मोठी कारवाई केली
3 कोटी 1 लाख 20 हजाराचा एमडी पोलिसांनी जप्त केला आहे..
यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली
कांदिवलीतील लोखंडवाला सर्कल येथील श्री विश्वकर्मण्ये चौक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईदरम्यान महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जमावाकडून मारहाण.
घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पक्षाला 20 वर्षे पूर्ण होताहेत त्यानिमित्ताने नोंदणी सप्ताह घ्यावा असं ठरलं. 9 ते 19 मार्च दरम्यान हा कार्यक्रम असेल. दरवर्षी मुंबई पुणे सारख्या शहरात आम्ही नोंदणी करतो. यावेळी छत्रपतींना अभिवादन करून याला सुरुवात करावी अशी कल्पना आली. त्यानुसार उद्या रायगडावर छत्रपतींच्या समाधी स्थळ आणि मेघडंबरीला अभिवादन करून याची सुरुवात करीत आहोत. ज्यांना ज्यांना पक्षात काम करायची इच्छा आहे त्यांनाही या नोंदणी सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील आज रंगपंचमीला मोठ्या उत्साहात यात्रा उत्सव साजरा केला जातो. या यात्रेसाठी लाखो भाविक मढी मध्ये दाखल झाले आहेत. रेवड्याची उधळण आणि गाढवांचा बाजार हे या यात्रेचे वैशिष्ट्य असून शेकडो देवकाठ्या मिरवणुकीने येऊन मंदिराच्या कळसाला लागल्यानंतर त्यांची यात्रा पूर्ण होते अशी या ठिकाणची परंपरा आहे. यासाठी विविध धार्मिक विधी गावोगावच्या भाविकांकडून केले जातात. संपूर्ण यात्रा परिसर व्यावसायिकांनी लावलेल्या दुकानांनी आलेल्या भाविकांनी गर्दीने फुलून गेला आहे. यात्रा उत्सव शांततेत सुरू आहे.या यात्रेसाठी मुस्लिम व्यवसायिकांना बंदी घातल्याने व्यापाऱ्यांची संख्या कमी होईल असे वाटत होते मात्र ही संख्या वाढली असल्याची माहिती सरपंच संजय मरकड यांनी दिली. तर यावर्षी भाविकांनी जास्त प्रमाणात गर्दी केली असल्याने देवस्थानच्या वतीने विविध उपयोजना केल्या असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी महाडमधील राही दळवी या चिमुकलीने शिव वंदना सादर केली. मुंबई ते महाड स्वतः ड्रायव्हिंग करून आलेले राज ठाकरे थांबले आणि त्यांनी राही साळवी या चिमूकलीची शिव वंदना आस्ता पुर्वक ऐकली.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज वर्ल्डकप फायनल होत आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी मधल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 2023 चा वर्ल्डकप फायनल ज्या स्टेडियमवर झाला, तिथेच आजचा सामना होत असला तरी 2023 च्या पराभवाचा भारत आज वाचपा काढेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
सकल हिंदू समाजाकडून तरुणावर कारवाईची मागणी
पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्याच्या बाहेर सकल हिंदू समाजाकडून जोरदार घोषणाबाजी
तरुणाकडून "पाकिस्तान जिंदाबाद" म्हणालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नागरिकांच्या भावनांचा अपमान झाला असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर कारवाई ची हिंदू संघटनांची मागणी
सकल हिंदू समाजाच्या वतीने काल रात्री पोलिस ठाण्याबाहेर करण्यात आला होता ठिय्या
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्याचा दिवसाभराचा संपूर्ण कारभार महिला पोलिसांच्या हाती देण्यात आला. यावेळी पोलिस स्टेशन गुलाबी बुग्याने सजवले होते
मनमाड नजीक असलेल्या दरेगावमध्ये रंगपंचमीनिमित्त कानिफनाथ महाराज रथोत्सव उत्साहात पार पडला.धुलीवंदनापासून यात्रेला सुरवात होते.ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ह्या जयघोषाने यात्रेला प्रारंभ करतात. रंगपंचमीला रथोत्सवाची अनेक वर्षांची परंपरा आहे. नऊ नाथांची वेशभूषा परिधान लहान मुले रथात विराजमान असतात.हा रथ ओढण्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बैलजोडीला मान मिळतो.घरोघरी सुवासिनी या रथाचे औक्षण करतात.पारंपारिक संबंळाच्या तालावर रंगांची उधळण करत नाचत आबालवृद्ध रथयात्रेत सहभागी होतात.
किशोर कुमार यांच्या गाण्यांचा अजित दादांकडे असलेला "तो" पेन ड्राईव्ह, स्वीय सहायक यांनी दिला आठवणींना उजाळा
किशोर कुमार यांचे गाणे ऐकताच दादांच्या स्वीय सहायक यांना कोसळलं रडू
दिवंगत अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांची भावनिक पोस्ट
मुसळे यांनी केलं संपूर्ण अनुभव कथन
सुनीलकुमार मुसळे हे सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत आहेत
पोस्टसोबत एक स्केच देखील मुसळे यांनी केलं अपलोड
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या जळगाव सपकाळ येथे राहणाऱ्या एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण होत IPS पदाला गवसणी घातलीय,26 वर्षाच्या भिकन रोजेकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 812 वा रँक घेऊन अतिशय कष्टातून शिकवणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय.
ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात गेल्याची घटना हिवरखेड - सोनाळा मार्गावर घडली...
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.. बस हिवरखेड़वरून सोनाळा दिशेने जात असताना चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरली.. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असल्याची प्राथमिक माहिती आहे...
शेतक-यांनी कष्टाने पिकवलेला शेतमाल द्राक्ष निर्यातीच्या मार्गावर अडकून पडलेलाय हा शेतमाल नाशवंत असल्याने निर्यातदारांसोबतच शेतकऱ्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. काही शेतीमाल पुन्हा भारतात परत येत असल्याने देशांतर्गत बाजारातही शेतीमालाचे भाव घसरले आहेत. दरम्यान, समुद्रात अडकलेल्या कंटेनरवर जहाज वाहतूक कंपन्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने निर्यातदारांची अडचण वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून हे अतिरिक्त शुल्क कमी करण्यासाठी पावले उचलावीत
होळीचा सण साजरा करून मुंबईकडे निघालेले कोकणवासी आणि पर्यटक मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीत आडकले
माणगावमध्ये मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा
माणगांव बाजारपेठ ते गारळ फाट्या पर्यत जवळपास सहा किलोमीटर पर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमध्ये पर्यटक आणि कोकणवासीय आडकले
वाहतुक कोंडीमुळे प्रवासी, पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांना हि होतो त्रास
जय पवार यांची उद्या होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली
उद्या मुंबईत होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलली
लवकरच नव्या पत्रकार परिषदेची तारीख जाहीर करणार
सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून कोंढणपूर मार्गे सिंहगड -डोणजे कडे टेम्पो येत असताना, घाटातील एका अवघड वळणावर काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलीय..
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही....टेम्पोमध्ये एकूण 5 जण होते..यातील ३ जणांना किरकोळ दुखापत झाली असून २ जण सुखरुप आहेत... वेळीच उडी मारून टेम्पोतून बाहेरं पडल्यानं हे सर्व जण सुखरू आहेत..
या टेम्पोतून लाकडाची वाहतूक केली जात होती.. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेची लोखंडी सुरक्षा जाळी तोडून हे वाहन खोल दरीत कोसळले..
अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर परिसरामध्ये महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे , या कारवाईचे दरम्यान स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या कारवाईला विरोध केला, यावेळी संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला , खासदार श्रीकांत शिंदेंनी यांनी आपले पुनर्वसन करावं अशी मागणी करण्यात आली
'जागतिक महिला दिना'चे औचित्य साधून युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी अकलूजमधील रस्त्यावर बसून ऊन-पावसात कष्ट करणाऱ्या भाजी विक्रेत्या महिला, बांगड्या विक्रेत्या महिला , केरसुनी विक्रेते महिला, आणि हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी भगिनींचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार असून राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेतेमंडळी सुद्धा मोठ्या संख्येने या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे हे उद्या सकाळी 8 वाजता किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रम स्थळी दाखल होणार आहेत. उद्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर सभासद नोंदणी सुरू होणार आहे. वर्धापन दिना निमित्ताने होणाऱ्या या सभेत खुर्चा लावल्या जाणा नाहीत अशी माहिती मनेसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
मुंब्रा भागातील अमृत नगर येथे एकाच दुचाकीवर स्वार होत तब्बल सहा जणांनी जीवघेणा प्रवास.. या घटनेचा व्हिडिओ शोषक मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वाहतूक भागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण झाले. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यासाठी पुण्यातील "तळ्यातल्या गणपतीला" साकडे
पुण्यातील सारसबाग येथील गणपती मंदिरात आरती
राजकीय पक्षासह शालेय विद्यार्थ्यांनी केली गणपती बाप्पाला प्रार्थना
भारतच सामना जिंकणार क्रिकेट चाहत्यांना विश्वास
भारत विरुद्ध न्यू झीलंड सामन्याआधी पुण्यासह राज्य आणि देशभरातील मंदिरात पूजा अर्चा
रंगपंचमी निमित्ताने हुल्लडबाजी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क
कोल्हापूर-गगनबावडा रोडवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू
रंगपंचमीची पार्टी करण्यासाठी तरुणाची ग्रामीण भागाला पसंती
कोल्हापूर- गगनबावडा रोडवर दोन तासात पाचशे वाहनांची तपासणी
पंधरा वाहनांवर केली पोलिसांनी कारवाई
राज्यसभेत हॅट्रिकनंतर रामदास आठवले यांनी घेतले साई समाधीचे दर्शन...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शिर्डीत साईचरणी नतमस्तक...
कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी दिल्या रंगपंचमीच्या खास शुभेच्छा
सिंधुदुर्गातील आंबा व काजू बागायतदार अडचणीत सापडले आहेत. लहरी हवामान व अवकाळी पावसाचा फटका आंबा व काजू ला बसला आहे. आंबा काजू ला नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्गातील बागायतदार शेतकऱ्यांनी 12 मार्च रोजी रस्त्यावर उतरून आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह देवगड येथील आंबा बागांची पाहणी केली. आंबा बागायतदारांची परिस्थिती अतिशय गंभीर असून शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी आबा बागायतदारांना दिले आहे.
शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथे स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग
प्लास्टिक स्क्रॅपमुळे आगीने घेतले भीषण रूप,
आकाशात पसरल्या काळ्या धुराच्या लाटा
गोडाऊन जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु मात्र आगीसोबत धुराचे लोट असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी अडचणी
बुलडाणा -
बुलडाण्याची ‘गुगल गर्ल’
१० सेकंदांत सांगितली भारतातील सर्व राज्यांची नावे
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील कोमल देविदास खनपटेची होतेय चर्चा
आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेची झलक दाखवत अनोखा विक्रम प्रस्थापित केला
अवघ्या १० सेकंदांत भारतातील सर्व राज्यांची नावे अचूकपणे सांगितली
कोमलने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले
मुंबई -
भांडुपमध्ये फेरीवाल्यांवर मनसेची कारवाही
काही दिवसांपूर्वी भांडुप मधील मनसे कार्यकर्त्या कडून करण्यात आली कारवाही
भांडुप खडी मशीन परिसरात फेरीवाल्यांचा हैदोस
वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीसाठी येत आहे अडथळे
वाहतुकीसाठी अडथळे होत असताना फेरीवाला याला बाजूला होण्यास सागितले म्हणून फेरीवाल्यांनी घातला सामान्य नागरिकांशी वाद
पुणे -
आज होत असलेल्या उड्डाणपुलाला अजित पवारांचं नाव द्यावं, ही सर्वांची इच्छा
उद्घाटन प्रसंगी होत असलेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मागणी
विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव द्या
अजित पवारांच्या संकल्पनेतून हा उड्डाणपूल तयार झाला आहे, म्हणून त्यांचं नाव उड्डाण पुलाला देण्यात यावं
बुलडाणा -
एसटी बस लवकर का घेऊन जातो, म्हणून हॉटेल चालकाकडून एसटी बस चालकाला शिवीगाळ आणि धमकी ..
चिखली पोलिसांत अधिकृत थांबा असलेल्या हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल ..
यापूर्वी सुद्धा याच हॉटेल चालकाविरुद्ध अनेक तक्रारी ..
मात्र हॉटेल चालकाचा मुजोर पना जाईना ..
पुणे -
पुण्यातील विद्यापीठ चौकातील डबलडेकर पुलाचे आज उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑनलाइन असणार उपस्थिती
तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असणार कार्यक्रमाला उपस्थित
धाराशिव -
धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीत भाजपचा अध्यक्ष होणार ?,पंचायत समिती सभापती निवडीतून स्पष्ट संकेत
पंचायत समिती सभापती पद शिवसेनेला देत भाजपने अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी केल्याची माहिती
महायुतीत लढलेल्या पाच पंचायत समिती मध्ये तीन पंचायत समितीवर शिवसेनेचा सभापती
कळंब पंचायत समितीत भाजपचे पाच सदस्य असताना तीन सदस्य असलेल्या शिवसेनेला सभापती पद
तर उमरगा पंचायत समितीत शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीसाठी सभापतीपद ,तर भाजपचा उपसभापती
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड 13 मार्चला,अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता
पुणे -
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका
मोडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेटस्वारांवर ग्रामीण पोलिसांकडून कारवाई
नागरिकांच्या तक्रारीनंतर आतापर्यंत १० बुलेटचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ल्यांकडे जाणाऱ्या काही उत्साही बुलेटस्वारांमुळे कर्कश आवाज होत असल्याने ही कारवाई करण्यात आली
भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ग्रामीण पोलिसांची कारवाई
बुलेटस्वरांना यापुढेही कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा
नाशिक -
- जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकमध्ये ‘स्वावलंबी महिला रंगोत्सव’
- एकल महिलांकडून रंगांची उधळण, 300 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
- जिल्हा परिषद नाशिकचा अनोखा उपक्रम
- ‘स्वावलंबी महिला रंगोत्सव’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
- अनेक वर्षांनी एकल महिलांनी रंगपंचमी साजरी केली
- महिलांना आत्मविश्वास आणि सन्मानाचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
नाशिक -
- बोगस शालार्थ आयडी प्रकरणात मोठी अपडेट
- एसआयटीच्या पहिल्या अहवालात १५० शिक्षकांची नावे
- संबंधित शिक्षकांचे वेतन थांबवले
- शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढली
- तपासाच्या कक्षेत सुमारे २ हजार जण येण्याची शक्यता
- अधिकारी, कर्मचारी आणि संस्थाचालक रडारवर
- नाशिक विभागासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू
- बोगस शालार्थ आयडीवरून शिक्षक भरती केल्याचा आरोप
- शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
नागपूर -
पूर्वेश दुरुगकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर उपस्थित होते.
या सोबतच सैन्य दलातील एअरफोर् मधील अनेक अधिकारी यांनीही मानवंदना अर्पण केली
यावेळी सलामी म्हणून 12 जणांनी राऊंड फायर केला.
त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडल्यावर कुटुंबीयांना तिरंगा ध्वज देण्यात आला.
यावेळी कुटुंबीयांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले.
पूर्वेश दूरुगकर अमर रहे अशा शब्दात त्याला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
यावेळी उपस्थिताचे डोळे पानावल्याचेही पाहायला मिळाले.
वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी पूर्वेशने जगाचा निरोप घेताल.
नाशिक -
- नाशिकमध्ये रंगोत्सव, होळीनंतर पंचमीला रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा
- पेशवेकालीन पारंपरिक ८ रहाडीत नैसर्गिक रंग ओतून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा
- तर शहरात अनेक ठिकाणी रेन शॉवरच्या माध्यमातून रंगपंचमीच आयोजन
- थोड्याच वेळात होणार नाशकात रंगणार पारंपरिक रहाडोत्सव
पुणे -
१० दिवसात पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास
माजी पोलीस अधिकारी दिपक चव्हाण यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी केला सायकल प्रवास
पुणे ते कन्याकुमारी असा तब्बल १६०० किलोमीटर मार्ग १० दिवसात पूर्ण केलाय
१९ फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी सुरुवात केली होती
पुणे, पंढरपूर ,बंगलुरू, सेलम, मदुराई मार्गे त्यांनी गाठले कन्याकुमारी
दिपक चव्हाण यांनी केलेल्या सायकल प्रवासाचकौतुक केल जात आहे
सांगली -
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी
महापालिकेत झाले तर जिल्हा परिषदेत होणार नाही
खासदार विशाल पाटील यांची भाजपवर टीका
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारलं
मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय
सत्तेत एवढे प्रेम का ? आहे, हे कळत नाही.. पण यापुढे भाजपाने जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी
पुणे -
पुणे महापालिकेतील एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणी
पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद चर्चेचा विषय
एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिल्ली दरबारी नेत्यांशी स्थानिक नेत्यांचा संपर्क
काँग्रेस मध्ये एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी ६८ अर्ज
इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या तीन नेत्यांकडून अहवाल प्रदेश कार्यालयात पाठवला
स्वीकृत नगरसेवक पदाचे नाव प्रदेशकडून शहर कार्यालयाला कळवले जाणार
मालेगाव पोलिस परिमंडळाकडून ३७ ठिकाणी छापे मारुन गावठी हातभट्ट्या अड्डे उद्ध्वस्त
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावठी दारुच्या हातभट्ट्या अवैधरित्या सुरु
मालेगाव पोलिस परिमंडळाच्या २० विशेष पोलिस पथकाने,मालेगाव तालूका, वडनेर-भैरव,चांदवड, नांदगाव, सटाणा, येवला तालुका अशा ३७ ठिकाणी छापे माले
जवळपास १० लाख ४६ हजार रुपये किमतीचे २० लाखांपेक्षा जास्त लिटर दारु आणि रसायन नष्ट केले आहे
विशेष म्हणजे मालेगावचे अप्पर पोलिस अधिक्षक तेगबिर संधून हे स्वत या मोहिमेत सहभागी झाले होते.
पुणे -
पुण्यात क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी
भारत न्यू झीलंड सामना संपल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांचा "स्पेशल वॉच"
सामना संपल्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर कारवाईची शक्यता
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय झाला तर मोठ्या प्रमाणावर चाहते उत्साह साजरी करणार, या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुद्धा खबरदारी
रस्ते अडवणे, गाडीचे सायलेन्सर वाजवून धिंगाणा करणे, रस्त्यावर फटाके फोडून नागरिकांना त्रास देणे असे केल्यास पोलिसांकडून होणार कारवाई
पुण्यातील एफ सी रोड वर भारताचा विजयानंतर चाहत्यांकडून होतं सेलिब्रेशन
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.