Sunidhi Chauhan : "करिअरमध्ये असं पहिल्यांदाच..."; लाइव कॉन्सर्ट दरम्यान सुनिधी चौहान झाली इमोशनल, VIDEO चर्चेत

Sunidhi Chauhan Viral Video : प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानचा लाइव कॉन्सर्ट पार पडला. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात सुनिधी चौहान खूप भावुक होऊन चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे.
Sunidhi Chauhan Viral Video
Sunidhi Chauhansaam tv
Published On
Summary

सुनिधी चौहानच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत.

गायिका सुनिधी चौहानचा लखनऊ येथे लाइव कॉन्सर्ट पार पडला.

सुनिधी लाइव कॉन्सर्ट दरम्यान खूप भावुक झाली.

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना घायाळ करणारी गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) नेहमी आपल्या गाण्यामुळे चर्चेत असते. तिच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. तिच्या गाण्यांची तरुणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळते. तिच्या कॉन्सर्टच्या तिकिट झटपट विकल्या जातात. सध्या सुनिधी चौहान तिच्या टूरवर आहे. ज्यात ती अनेक ठिकाणी लाइव कॉन्सर्ट करताना दिसत आहे. सध्या तिचा लाइव कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाइव कॉन्सर्टमध्ये गाणे गाताना सुनिधी चौहान अचानक थांबली. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. थोड्या वेळासाठी कॉन्सर्ट शांत झाला. त्यानंतर सुनिधीने चाहत्यांची माफी मागितली आणि सांगितले की, तिचा घसा खराब आहे. तिला गाणे गाताना त्रास होत आहे. तरी देखील सुनिधीने आपला लाइव कॉन्सर्ट पूर्ण केला. सुंदर गाणी गायली. चाहत्यांना निराश केले नाही. यासर्वात सुनिधी चौहान खूप भावुक झाली आणि चाहत्यांसोबत तिने संवाद साधला.

सुनिधी चौहान झाली भावुक

"सॉरी, आज माझा आवाज खूपच खराब आहे. माझ्या गाण्याच्या कारकिर्दीत असे पहिल्यांदाच घडले आहे. पण तुम्ही माझ्यासोबत आहात. तर मी तुमच्यासाठी गाणी गाणार आहे..." सुनिधी चौहानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. नेटकरी सुनिधीचे कौतुक करत आहे. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

गायिका सुनिधी चौहान सध्या तिच्या "आय एम होम इंडिया टूर" वर आहे. या टूर अंतर्गत तिचा काल (7 मार्च 2026) रोजी लखनऊ येथे लाइव कॉन्सर्ट आयोजित केला होता. हा कॉन्सर्ट संध्याकाळी 7 च्या सुमारास सुरू झाला. हा कॉन्सर्ट गोल्फ सिटीतील कूलब्रीझ रिसॉर्ट्स येथे पार पडला. या लाइव कॉन्सर्टला सुनिधी चौहानचा आवाज ऐकण्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.

Sunidhi Chauhan Viral Video
Force 3 : अ‍ॅक्शनचा डबल डोस घेऊन येतोय 'फोर्स 3' ; जॉन अब्राहमसोबत झळकणार 'हा' सुपरस्टार, शूटिंग सेटवरील VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com