Shreya Maskar
रितेश देशमुखचे 'आला होळीचा सण लई भारी' हे गाणे होळी पार्टीत वाजलेच पाहिजे. 'लय भारी' या मराठी चित्रपटातील हे गाणे आहे.
'बलम पिचकारी' या गाण्याशिवाय आजकालच्या तरुणाईची होळी अपूर्ण आहे. हे गाणे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या 'ये जवानी है दीवानी' चित्रपटातील आहे.
ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी गायले 'खेळताना रंग बाई होळीचा' हे गाणे ऐकताच मन बेभान होऊन नाचायला लागते.
होळीला सर्वजण रंगात रंगून जातात. त्यामुळे तुमच्या प्ले लिस्टमध्ये 'रंग बरसे' गाणे असायलाच हवे. अमिताभ बच्चन यांच्या 'सिलसिला' चित्रपटातील हे गाणे आहे.
'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायले आहे. हे गाणे श्रीकृष्ण आणि राधा यांच्यावर आधारित आहे.
'होली खेले रघुवीरा' हे गाणे 'बागबान' चित्रपटातील आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत आहेत.
'गोंधळात गोंधळ' या मराठी चित्रपटातील 'अगं नाच नाच राधे उधळूया रंग' हे गाणे होळीला आवर्जून वाजवा. यावर दिलखुलास डान्स करता येतो.
'वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम' चित्रपटातील 'डू मी ए फेवर लेट्स प्ले होली' गाणे होळाचा सणाला चारचाँद लावते. या चित्रपटात प्रियांका आणि अक्षय कुमार पाहायला मिळत आहेत.
रितेश देशमुखच्या 'माऊली' चित्रपटातील 'धुवून टाक' या गाणे अजय-अतुल यांनी गायले आहे.
'शोले' चित्रपटातील 'होली के दिन दिल खिल जाते हैं' हे गाणे होळीचा उत्सव आणखी रंगतदार बनवते. या गाण्यात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पाहायला मिळत आहे.