Shreya Maskar
बॉलिवूड गायक अरिजीत सिंगने 27 जानेवारी 2026 ला सोशल मीडियावर पोस्ट करून प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतल्याची माहिती दिली.
महिन्याभरापूर्वी अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून रिटायरमेंट घेतली आहे. यामुळे चाहते खूपच नाराज होतात. मात्र आता अरिजीतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. जे सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. अरिजीतने आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.
अरिजीत सिंगच्या पहिल्या स्वतंत्र गाण्याचे नाव 'रैना' (RAINA) असे आहे. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार शेखर रवजियानी यांनी संगीत दिले आहे. प्रिया सरैया हिने गीतलेखन केले आहे.
अरिजीत सिंगच्या नवीन गाण्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देत आहे. चाहते गाण्याचे भरभरून कमेंट्स करत आहे. गाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
27 फेब्रुवारी 2026 ला अरिजीत सिंगचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. अरिजीत सिंगने चित्रपटात गाणी गाण्याव्यतिरिक्त संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे.
garuudaamusiic युट्यूब चॅनेलवर अधिकृत व्हिडिओ पाहायला मिळत आहे. प्रेम करणाऱ्यांनी हे गाणे ऐकलेच पाहिजे.
'आशिकी २'च्या गाण्यामुळे अरिजित सिंहला खूप लोकप्रियता मिळाली आहे. अरिजित सिंहच्या कॉन्सर्टकडे आणि नवीन गाण्याकडे चाहत्यांचे कायमच लक्ष लागून असते.