Famous Actress : संन्यास घेतलेल्या अभिनेत्रीचे २५ वर्षांनी धमाकेदार कमबॅक, 'या' शोमध्ये झळकणार

Shreya Maskar

ममता कुलकर्णी

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या होत्या.

Mamta Kulkarni | instagram

टिव्हीवर कमबॅक

ममता कुलकर्णी यांनी आता 25 वर्षांनी टिव्हीवर धमाकेदार कमबॅक केले आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. त्या एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mamta Kulkarni | instagram

शोचे नाव काय?

मीडिया रिपोर्टनुसार, ममता कुलकर्णी या 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट सीझन ३' या शोमध्ये दिसणार आहेत. हा एक कुकिंग रिअॅलिटी शो आहे.

Mamta Kulkarni | instagram

सुंदर लूक

अलिकडेच ममता कुलकर्णी या 'लाफ्टर शेफ्स ३' च्या सेटवर दिसल्या. सुंदर गुलाबी आणि गोल्डन रंगाची साडी त्यांनी नेसली होती. त्या या कार्यक्रमासाठी खूपच उत्साही पाहायला मिळाल्या.

Mamta Kulkarni | instagram

लाफ्टर शेफ्स ३

'लाफ्टर शेफ्स ३' चे होस्टिंग कॉमेडी क्वीन भारती सिंग करणार असून, शोचे परीक्षक शेफ हरपाल सिंह सोखी हे आहेत.

Mamta Kulkarni | instagram

भावना व्यक्त केल्या

मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या की, "मी 25 वर्षांनंतर टिव्हीवर परत येत आहे. जीवन खूप गंभीर झाले आहे, तेव्हा स्वयंपाक करताना हसण्यापेक्षा चांगले काय असू शकते?" असे बोलत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला."

Mamta Kulkarni | instagram

करिअरची सुरुवात

ममता कुलकर्णी यांनी 90चे दशक गाजवले आहे. ममता कुलकर्णी यांनी 1991 मध्ये 'नानबरगल' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली.

Mamta Kulkarni | instagram

बॉलिवूड पदार्पण

ममता कुलकर्णी यांनी 1992 मध्ये 'तिरंगा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ममता कुलकर्णी खूप काळ दुबई राहत होत्या.

Mamta Kulkarni | instagram

NEXT : 'बिग बॉस मराठी ६'मध्ये होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, 'या' ग्लॅमरस अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

Bigg Boss Marathi 6 | instagram
येथे क्लिक करा...