Yashasvi Jaiswal Century in Perth test saam tv
Sports

Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

Yashasvi Jaiswal Century in Perth test: पर्थमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिली टेस्ट खेळवण्यात येतेय. खेळाच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने त्याचं शतक पूर्ण केलं.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल ऑस्ट्रेलिया टीमवर चांगलाच भारी पडलेला दिसला. पर्थमध्ये भारत विरूदध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिली टेस्ट खेळवण्यात येतेय. या सामन्यात कांगारूंच्या गोलंदाजीला धु-धु धुत यशस्वीने सेंच्युरी झळकावलीये. या सामन्यात शतक ठोकत यशस्वीने एक खास रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे.

जयस्वालने झळकावलं शतक

खेळाच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालने त्याचं शतक पूर्ण केलं. यावेळी त्याने थेट सिक्स लगावत शतक पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालचं टेस्ट कारकिर्दीतील हे चौथं शतक आहे. ऑस्ट्रेलियात भारतासाठी डेब्यू सामन्यात शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय. एमएल जयसिम्हा आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर खेळल्या गेलेल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक करणारा तो तिसरा भारतीय ठरला.

जयस्वाल ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा चौथा सर्वात युवा भारतीय खेळाडू असून त्याने परदेशात दुसरं शतक झळकावलंय. यापूर्वी यशस्वीने वेस्ट इंडिजमध्येही शतक झळकावलं होतं. हे त्याच्या टेस्टमधील पहिलं शतक होतं.

पर्थ टेस्टमध्ये जयस्वाल पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, पण दुसऱ्या डावात त्याने उत्तम पद्धतीने कमबॅक करत शतक झळकावलंय. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं झळकावणारा तो दुसरा युवा ओपनर आहे. यावेळी एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने ब्रेंडन मॅक्क्युलमला मागे टाकलंय.

ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू टेस्टमध्ये शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

  • 101 – एमएल जयसिम्हा, ब्रिस्बेन, 1967-68

  • 113 – सुनिल गावस्कर, ब्रिस्बेन, 1977-78

  • 126* – यशस्वी जयस्वाल, पर्थ, 2024

वयाच्या २३ वर्षी सर्वाधिक टेस्ट शतकं (भारत)

  • 8 – सचिन तेंडुलकर

  • 5 – रवि शास्त्री

  • 4 – सुनील गावस्कर

  • 4 – विनोद कांबळी

  • 4 – यशस्वी जयस्वाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT