सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ५ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. यामधील दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे. लीड्समध्ये पहिला टेस्ट सामना गमावल्यानंतर बर्मिंघममधील एजबस्टन मैदानावर भारताने दुसरा सामना 336 रन्सने जिंकत सिरीजमध्ये बरोबरी साधली.
या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने दोन्ही डावांमध्ये शतक ठोकत सामन्यामध्ये भारताची बाजू मजबूत केली. यावेळी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा अवॉर्डही देण्यात आला. गिलने पहिल्या डावात जबरदस्त 269 रन्सची खेळी केली, तर दुसऱ्या डावातही तो 161 रन्सची तुफान खेळी केली.
इंग्लंडविरूद्धच्या या विजयानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27) च्या नव्या फेरीत पहिलं विजयाचं खातं उघडलं आहे. या विजयामुळे भारताचं पॉइंट्स टक्केवारी (PCT) आता 50 टक्के झालीये. यामध्ये इंग्लंडचा PCT देखील 50 आहे. मात्र इंग्लंडच्या टीमला पराभवामुळे मोठा फटका बसलाय.
गेल्या WTC फेरीत भारत तिसऱ्या क्रमांकावर होता आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला होता. 2021 मध्ये भारताला न्यूझीलंडने हरवलं होतं, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्विकारावा लागला होता. दरम्यान, 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून चॅम्पियनचा किताब पटकावला होता.
सध्या ज्या दोन टीम्स खेळल्या आहेत त्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया अजूनपर्यंत पराभूत झालेले नाहीत. श्रीलंकेचा PCT सध्या 66.67 आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकून 100 टक्के पॉइंट्सवर आघाडीवर आहे. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टेस्ट सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा सामना जिंकून हे यश मिळवलं आहे.
श्रीलंकेचा २ सामन्यांत १ विजय आणि १ पराभव असल्यामुळे ते दुसऱ्या स्थानी आहेत. इंग्लंड सध्या तिसऱ्या आणि भारत चौथ्या स्थानी आहे. बांगलादेश पाचव्या तर वेस्ट इंडिज सहाव्या स्थानी आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या तीन टीम्सने अजून एकही सामना खेळलेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.