
Ind Vs Eng 2nd Test : बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवर ३३६ धावांनी मात केली आहे. एजबॅस्टन कसोटी सामना जिंकत भारताने मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली आहे. एजबॅस्टनमध्ये मागील ५८ वर्षात भारतीय संघाला सामना जिंकला आला नव्हता. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताच्या संघाने एजबॅस्टनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. फलंदाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारताला विजय मिळाला आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी उतरण्याचे आमंत्रण दिले. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी मैदानात उतरली. जैस्वालने ८३ धावांची खेळी केली. केएल राहुल २ धावांवर बाद झाला. करुण नायर जास्त धावा करु शकला नाही, तो ३१ धावा करुन माघारी परतला. सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिल चमकला, त्याने २६९ धावांची विक्रमी खेळी करत अनेक विक्रम रचले. त्याला रवींद्र जडेजाची साथ लाभली. जडेजानेही महत्त्वाच्या ८९ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही ४२ धावांचे योगदान दिले. ५८७ धावांवर भारताचा डाव संपला.
भारताचा डाव संपल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातीचे ३ गडी पाठोपाठ बाद झाले. पण हॅरी ब्रूक (१५८) आणि जॅमी स्मिथ (१८४) धावांची तगडी भागीदारी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त कोणीही फारशी चांगली कामगिरी केली नाही. या डावात मोहम्मद सिराजने सहा विकेट्स आणि आकाश दीपने चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव ४०७ धावांवर समाप्त झाला.
दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने २८ धावा केल्या, तर केएल राहुलने अर्धशतकीय खेळी केली. करुण नायर २६ धावांवर बाद झाला. पहिल्या डावाप्रमाणे, दुसऱ्या डावातही शुभमन गिलने दमदार खेळी केली. त्याने १६१ धावा केल्या. रिषभ पंतने ६५ धावा, रवींद्र जडेजाने ६९ धावा केल्या. शुभमन गिलने सामन्याच्या चौथ्या दिवशी डाव घोषित केला आणि इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले.
चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. झॅक क्रॉली शून्यावर बाद झाला. दिवसाच्या शेवटी ७२ धावा आणि ३ विकेट्स अशी इंग्लंडची परिस्थिती होती. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या खेळाडूंना नमवले. आकाश दीपने दमदार खेळी करत ६ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ अशा ४ विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.