
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावांचा डोंगर रचलाय. टीम इंडियानं पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आहेत. त्यानंतर त्या धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा अर्धा संघ मात्र ८७ धावांवर तंबूत परतला. पण यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ जोडीनं सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
याच दरम्यान हॅरी ब्रूकनं मारलेल्या एका फटक्यामुळे संपूर्ण देशाची धाकधूक वाढवली होती. कारण त्याने मारलेला चेंडू थेट भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या डोक्यावर लागला. त्यामुळे खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला होता. ही घटनेमुळे संपूर्ण भारतीयांची धकधक वाढली.
इंग्लंडकडून जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक ही जोडी मैदानात खेळत होती. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७ व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ब्रूकनं एक जोरदार फटका खेळला.चेंडू वेगाने शुबमन गिल क्षेत्ररक्षण करत असलेल्या दिशेने गेला. गिल त्या चेंडूचा झेल घेण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु चेंडू थेट त्याच्या डोक्याला लागला. त्याला चेंडू लागताच रिषभ पंत गिलकडे गेला.
मैदानातील या घटनेनंतर फिजिओही मैदानात आले होते. काही वेळासाठी खेळ थांबवण्यात आला. हे दृश्य टीम इंडियातील ताफ्यातील खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची धकधक वाढवणारे होते. पण सुदैवाने फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे गिलला मोठी दुखापत होण्याचा अनर्थ टळला.
भारतीय संघाने उभारलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात अर्धा संघ अवघ्या ८७ धावांत तंबूत परतला होता. पण त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीनं द्विशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांची भागीदारीने दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने जोरदार कमबॅक केलंय.
जेमीने टेस्टमध्ये टी२० स्टाईलनं शतक ठोकलं. जेमीने प्रसिध कृष्णा याच्या एका ओव्हरमध्ये २३ धावा केल्या. जेमी आणि हॅरी या जोडीने कोणत्याही दबावात न खेळता भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. जेमीनने प्रसिध कृष्णाच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.