Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ravindra Jadeja vs Ben Stokes : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्ससोबत झालेल्या खडाजंगीमागचं कारण टीम इंडियाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा यानं सांगितलंय. स्टोक्स वारंवार माझ्याविषयी पंचांकडे तक्रार करत होता, असं जडेजा म्हणाला.
ben stokes and ravindra Jadeja
ben stokes and ravindra Jadeja saam tv
Published On

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एजबेस्टनच्या मैदानावर बेन स्टोक्ससोबत झालेल्या वादावादीवर टीम इंडियाचा ऑलराउंडर रविंद्र जडेजा यानं प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजानं बेन स्टोक्ससोबत झालेल्या बाचाबाचीचं कारण स्पष्ट केलं आहे. स्टोक्स हा वारंवार माझ्याविषयी पंचांकडे तक्रार करत होता, असं त्यानं सांगितलं.

इंग्लंडचे खेळाडू माइंड गेम खेळत होते. भारतीय फलंदाज मैदानावर टिच्चून होते, त्यामुळे ते वारंवार डिवचत होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळात पाणी मागवलं होतं. त्यावेळी इंग्लंडचे खेळाडू त्यावर कमेंट करत होते, असंही जडेजानं सांगितलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना असला की खेळाडूंची खरी कसोटी लागते. दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे आपण याआधीच्या मालिकांमध्येही पाहिलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही हेच चित्र बघायला मिळालं. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच बेन स्टोक्स आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात बाचाबाची झाली होती. क्रिस वोक्सकडून जडेजाची पंचांकडे तक्रार केल्यानंतर स्वतः त्यांचा कर्णधार बेन स्टोक्सही मैदानात आला.

मैदानावर टिच्चून फलंदाजी करणाऱ्या जडेजाची एकाग्रता भंग करण्याचा अनेकदा प्रयत्नही झाला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जडेजावर आरोप करण्यास सुरुवात केली. जडेजा हा खेळपट्टीच्या डेंजर झोनमधून धावतोय, त्यामुळं खेळपट्टी खराब होतेय, अशी तक्रार करण्यास सुरुवात केली. जडेजा जाणूनबुजून असं काही करतोय असं त्यांचं म्हणणं होतं. स्टोक्सनं तर जडेजाकडे हातवारे करत तू काय केलंस बघ असंही सांगितलं.

बेन स्टोक्स याच्यासह इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या आरोपांवर जडेजानंही स्पष्टीकरण दिलं. मी असं का करू? माझं लक्ष फलंदाजीवर आहे. खेळपट्टी खराब करण्याचा माझा काही हेतू नव्हता. बेन स्टोक्स माझी वारंवार पंचांकडे तक्रार करत होता, असं जडेजानं सांगितलं. खेळपट्टी माझ्यासाठी रफ करत असल्याचं स्टोक्सला वाटत होतं. खरं तर ते वेगवान गोलंदाजांना षटके देऊन खेळपट्टी रफ करत होते. मला तर त्याची गरजच वाटली नाही. ते वारंवार तक्रार करत होते. पण माझा तसा काहीच हेतू नव्हता, असंही जडेजानं स्पष्ट केलं.

ben stokes and ravindra Jadeja
Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलचं धडाकेबाज द्विशतक, इंग्लंडमध्ये ऐतिहासिक खेळी

जडेजा म्हणाला की, मी काही वेळा वेगवेगळ्या दिशेने जात होतो. पण माझ्या डोक्यात असलं काही नव्हतं. आम्हाला जर उद्या संधी मिळाली तर चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जितकं होईल तितकं चांगलं खेळण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

ben stokes and ravindra Jadeja
India vs England : भारताविरुद्ध इंग्लंडनं टाकला मोठा डाव; दुसऱ्या कसोटीसाठी संघात खतरनाक गोलंदाजाची एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com