Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal Saam Tv
Sports

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला फुटला घाम; संगीता फोगटने खांद्यावर उचलून गरगर फिरवलं, VIDEO

Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal: भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संगीता फोगटने युजवेंद्रला डोक्यावरून उचलून फिरवल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

Sangeeta Phogat Yuzvendra Chahal Video

कुस्तीपटू संगीता फोगट (Sangeeta Phogat) आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संगीता फोगटने युजवेंद्र चहलला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलून फिरवल्याचं दिसत आहे. यामुळे चहलचा चेहरा पूर्णपणे लाल झाला आहे. यावेळी इतरही अनेक लोकं घटनास्थळी उपस्थित होते. (Cricket news in marathi)

आता हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चहल आणि संगीता यांच्यातील हा मजेशीर प्रसंग चाहतावर्ग एन्जॉय करत आहे. यावर चाहत्यांनी चहलसोबत खूप मजाही केली (Sangeeta Phogat Spin Yuzvendra Chahal) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत

ही घटना शुक्रवारी रात्री एका डान्स शोदरम्यान पाहायला मिळाली. या पार्टीत युजवेंद्र चहल, त्यांची पत्नी धनश्री वर्मा, संगीता फोगट (Wrestler Sangeeta Phogat) यांच्यासह अनेक बडे चेहरे उपस्थित होते. चहलची पत्नी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. ती पाच फायनलिस्टमध्ये होती, पण जिंकू शकली नाही. संगीता फोगट देखील या शोचा एक भाग होती, परंतु ती बाहेर आहे. मात्र तरीही ती पार्टी एन्जॉय करण्यासाठी या शोचा भाग बनली.

यावेळी सर्वजण पार्टीचा आनंद लुटत असताना संगीता फोगटने चहलला दोन्ही हातांनी वर उचलले. त्याला फिरवायला सुरुवात केली. हे पाहून आजूबाजूचे लोकही खूप हसत (Sangeeta Phogat Yuzvendra Chahal Video) आहे. यावेळी चहलचा चेहराही पूर्णपणे लाल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओवर चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.

22 मार्चपासून आयपीएल 2024

सध्या युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal Video) आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहे. तो राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळतो. यापूर्वी युजवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात होणार आहे.

संगीता फोगट आणि युजवेंद्र चहलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. संगीता फोगटने युजवेंद्र चहलला खांद्यावर उचलून गरगर फिरवल्याचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT