Mohammed Shami Surgery: टीम इंडियाला मोठा धक्का! IPL पाठोपाठ मोहम्मद शमी T20 WC स्पर्धेतूनही बाहेर

Mohammed Shami Latest News: भारतीय संघाचा स्टार फलंदाज मोहम्मद शमी हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसून आलेला नाही. या स्पर्धेदरम्यानही तो दुखापतग्रस्त होता.
Star Indian cricketer mohammed shami had successfull heel operation on achilles tendon may miss ipl 2024 and t20 world cup 2024
Star Indian cricketer mohammed shami had successfull heel operation on achilles tendon may miss ipl 2024 and t20 world cup 2024 twitter
Published On

Mohammed Shami News In Marathi:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज मोहम्मद शमी हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसून आलेला नाही. या स्पर्धेदरम्यानही तो दुखापतग्रस्त होता. मात्र तरीही तो संघासाठी खेळत राहिला. संघाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकताच शमीच्या दुखापतीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली आहे. (Mohammed Shami News)

मोहम्मद शमीने आपल्या एक्स अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो रुग्णालयात असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहीले की, ' माझ्या घोट्याच्या दुखण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या सर्वकाही ठीक आहे. मला सावरण्याासाठी वेळ लागणार आहे. लवकरच मी स्वत:च्या पायावर उभा राहील.' वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता.

Star Indian cricketer mohammed shami had successfull heel operation on achilles tendon may miss ipl 2024 and t20 world cup 2024
Rohit Sharma Statement: या खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दार कायमचे बंद? रोहित शर्माचा मोठा खुलासा

या दुखापतीमुळे त्याला मैदानापासून दूर राहावं लागलं आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे त्याला आयपीएल आणि आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला मुकावं लागणार आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीचा फटका गुजरात टायटन्स आणि भारतीय संघालाही बसणार आहे. (Cricket news marathi)

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

मोहम्मद शमीने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. त्याने या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये सर्वाधिक २४ गडी बाद केले होते. संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच आयपीएल स्पर्धा तोंडावर असताना शमी स्पर्धेतून बाहेर होणं हा गुजरात टायटन्स संघासाठी देखील मोठा धक्का असणार आहे. कारण गेल्या हंगामात तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता.

Star Indian cricketer mohammed shami had successfull heel operation on achilles tendon may miss ipl 2024 and t20 world cup 2024
IND vs ENG Test Series: मायदेशात टीम इंडिया शेर! इंग्लंडला नमवत जिंकली सलग १७ वी कसोटी मालिका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com