Ind Vs SL: T20 मालिकेत युजवेंद्र चहल करणार का किमया? मोठ्या विक्रमापासून अवघा चार बळी दूर

या मालिकेत युजवेंद्र चहलकडे मोठा विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. या विश्वविक्रमापासून तो अवघी चार पावले म्हणजेच चार विकेट्स लांब आहे.
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal Saam TV
Published On

Ind Vs SL: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उद्यापासून भारतीय संघ श्रीलंकेसोबत टी ट्वेंटी मालिकेला सुरूवात करणार आहे. आगामी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका म्हणजे भारतीय संघासाठी मोर्चेबांधणी ठरणार आहे. त्यामुळेच प्रत्येक खेळाडूकडे चमकदार कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी आहे. या मालिकेमध्ये सर्वाधिक लक्ष टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहलच्या कामगिरीकडे असेल.

या मालिकेत युजवेंद्र चहलकडे मोठा विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. या विश्वविक्रमापासून तो अवघी चार पावले म्हणजेच चार विकेट्स लांब आहे.

Yuzvendra Chahal
Ind Vs SL: बुमराह शमी नव्हे, 'हे' दोन गोलंदाज फोडणार श्रीलंकेला घाम; टीम इंडियासाठी ठरणार हुकमी एक्के

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) मालिकेत युजवेंद्र चहलने चार बळी घेतल्यास त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद होऊ शकते. हा विश्वविक्रम म्हणजे टी ट्वेटीमध्ये युजवेंद्र चहलने अजून चार बळी घेतल्यास तो टी ट्वेंटीमध्ये भुवनेश्वर कुमारचा रेकॉर्ड मोडत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरु शकतो. सध्या युजवेंद्र चहलच्या नावावर 71 टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 87 बळी आहेत, तर या क्रमवारीत भुवनेश्वर कुमार 90 बळी मिळवत पहिल्या स्थानावर आहे.

या मालिकेमध्ये युजवेंद्र चहलकडे फक्त चार विकेट्स घेत हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळेच त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Yuzvendra Chahal
Jalgaon News: भाजपतर्फे अजित पवार यांच्‍या विरोधात आंदोलन; प्रतिमेला मारले जोडे

आत्तापर्यंत टी ट्वेंटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार 90, युजवेंद्र चहल 87, आर अश्विन 72, बुमराह 77 आणि हार्दिक पांड्या 62 बळी मिळवत पाचव्या स्थानी आहे. यासोबतच युजवेंद्र चहलने या मालिकेत 5 बळी घेतल्यास त्याच्या नावावर टीम इंडियाकडून मायदेशात 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज होण्याचाही विक्रम नोंद हईल. (Team India)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com