
Ind Vs SL T20 Siries: तीन जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये टी ट्वेंटी सामना रंगणार आहे. या मालिकेने दोन्ही संघाच्या नववर्षाची सुरूवात होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे देण्यात आले असून अनुभवी रोहित- विराटला विश्रांती देण्यात आली आहे.
भारत दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेची (Srilanka) डोकेदुखी दोन भारतीय गोलंदाज चांगलीच वाढवणार आहेत. त्यांचे जबरदस्त रेकॉर्ड पाहता भारतीय संघासाठी हे दोन खेळाडू टीम इंडियासाठी हुकमी एक्के ठरु शकतात.
मागच्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून खेळताना अर्शदिप सिंग आणि उमरान मलिक यांनी चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये अर्शदिप सिंगने त्याच्या यॉर्करने आणि शेवटच्या षटकांमधील भेदक माऱ्याने फलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहे. तर दुसरीकडे उमरानच्या गोलंदाजीही खेळाडूंची डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळेच या दोघांचीही गोलंदाजी भारतीय संघाला फायदेशीर ठरणार आहे.
अर्शदिप सिंग आणि उमरान मलिकचा हा जबरदस्त फॉर्म पाहता त्यांची कामगिरी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहपेक्षा चमकदार ठरणार आहे. दरम्यान, भारत श्रीलंका संघातील पहिला टी ट्वेंटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर सायंकाळी सात वाजता रंगणार आहे. श्रीलंकेविरुद्ध विजयी सुरूवात करण्यास टीम इंडिया उत्सुक असेल. (Indian Cricket Team)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.