Ind Vs SL: उद्या भारत- श्रीलंका भीडणार, कोणाचे पारडे जड, पाहा काय म्हणतात रेकॉर्ड? अशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI

मालिकेची सुरूवात तीन जानेवारीपासून टी ट्वेंटी सामन्याने होणार आहे. पाहूया या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यातील भारत आणि श्रींलंकेचा संभाव्य संघ.
IND Vs BAN 3rd ODI live match Streaming/BCCI
IND Vs BAN 3rd ODI live match Streaming/BCCISAAM TV
Published On

Ind Vs SL T20 Siries: नववर्षाच्या सुरूवातीलाच भारत आणि श्रीलंका संघ एकमेकांशी भिडणार आहेत. भारत दौऱ्यावर आलेला श्रीलंका संघ तीन टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यंदा होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे. ज्यामध्ये वर्षाची विजयी सुरूवात करण्यास भारतीय संघ आग्रही असेल.

या मालिकेची सुरूवात तीन जानेवारीपासून टी ट्वेंटी सामन्याने होणार आहे. पाहूया या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यातील भारत आणि श्रींलंकेचा संभाव्य संघ.

IND Vs BAN 3rd ODI live match Streaming/BCCI
Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या अपघातानंतर NHAI ची झोपच उडाली; रात्रीत खड्डे गायब

भारत आणि श्रीलंका संघामध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा यांना या टी ट्वेंटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भारत - श्रीलंका टी ट्वेंटी रेकॉर्ड-

भारत आणि श्रीलंका संघात आत्तापर्यंत ९ टी ट्वेंटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये टी इंडियाचे रेकॉर्ड जबरदस्त राहिले आहेत. या मालिकांमध्ये श्रीलंका संघाने आत्तापर्यंत भारतात एकही टी ट्वेंटी मालिका जिंकली नाही. या ९ टी ट्वेंटी मालिकांमध्ये भारताने सात मालिका जिंकल्या आहेत तर श्रीलंका संघाने फक्त एकदाच मालिका जिंकण्याची किमया केली आहे. यामधील उर्वरित एक मालिका अनिर्णित राहिली आहे.

IND Vs BAN 3rd ODI live match Streaming/BCCI
Jitednra Awhad : जितेंद्र आव्हाड संभाजी महाराजांवरील वादावरून सत्ताधाऱ्यांवर बरसले; म्हणाले,'हिंमत असेल तर...'

खेळपट्टी कशी असेल- भारत आणि श्रीलंका संघात खेळला जाणारा पहिला टी ट्वेंटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीचे वैशिष्ट्य म्हणजे फलंदाजांसाठी ही खेळपट्टी अनुकूल आहे. चेंडू पडल्यानंतर थेट बॅटवर येतो त्यामुळे फलंदाजी करणे सोपे होते. त्याचबरोबर ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठीही अनुकूल आहे.

संभाव्य भारतीय संघ- हार्दिक पांड्या (कर्णधार) , ईशान किशन (विकेटकीपर) , संजू सॅमसन, सुर्यकूमार यादव, शुभमन गील, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक (Indian Cricket Team)

श्रीलंका संघ- दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकिपर) , अविष्का फरनांडो, चरित असलंका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थीक्षणा, लाहिरु कुमारा, दिलशान मदुशंका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com